लोकल बातम्या
आजादी का अमृत महोत्सव दिव्यांग बांधवांच्या हस्ते साजरा…

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
वडझिरे येथे आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला
दिव्यांग बांधवांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न….
- सिन्नर : दि , 15 ऑगस्ट 2025 — तालुक्यातील वडझिरे जिल्हा परिषद सेमी इंग्रजी मॉडेल स्कूल वडझिरे येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रहार पक्षाचे सिन्नर तालुका संपर्कप्रमुख.मा.श्री सुनिल भाऊ जगताप ( दिव्यांग ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व मान्यवर वराचे सत्कार करण्यात आला. व दिव्यांग सुनिल भाऊ जगताप यांना शाल गुलाबांचे फुल व सदस्य दिपक बोडके यांचा पण सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष. संजय बोडके सर,उपाध्यक्ष.सुनिल जगताप,शिक्षणतज्ज्ञ.संगत गायकवाड,सदस्य.दिपक बोडके,प्रकाश सांगळे,सरिता कुटे,सरला रोकडे,दत्तू नागरे ,ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब बोडके,रामेश्वर बोडके,बाळु बोडके, प्रमोद ठोंबरे, सुभाष बोडके, नवनाथ बोडके,रोहन ठोंबरे,सोनु ठोंबरे,पुष्पा बोडके,शोभा बोडके,बेबीताई नागरे तुषार आंबेकर,मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, माजी सैनिक श्री अशोक नागरे, उपस्थित होते.व विद्यार्थ्यांची सायकल फेरी काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी भाषण व देशभक्तीपर गीते म्हटले व कवायत सादर केली.



