विधानपरिषदेत पत्ते खेळताना … कृषिमंत्री कोकाटे चा टाईमपास – महाराष्ट्रभर संताप,,,
व्हिडिओ पाहीला म्हणजे मी पाप केले का ? -- कृषिमंत्री

वेगवान मराठी / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि. 20 जुलै 2025 — महाराष्ट्र राज्यातील बहुतांश मंत्री कुठल्या न् कुठल्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत अशातच सिन्नर चे आमदार व विद्यमान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या एक व्हिडिओ समोर आला आहे… ऐकिकडे राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असतानाच दुसरीकडे मात्र कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानपरिषदेत चक्क मोबाईलवर रम्मी पत्ते खेळताना दंग असल्याची माहिती रोहित पवार यांनी ट्विट करून खळबळ उडवून दिली… या संदर्भात कृषिमंत्री कोकाटे यांनी म्हटले आहे की यासंदर्भात सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत घेऊन देणार असल्याचे जाहीर केले आहे… कोकाटे हे यापुर्वीच शेतकऱ्यांना वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रातील तमाम शेतकरी घायाळ झाला आहे… अशाच शेतकऱ्यांच्या हितासाठी काही महत्त्वाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी चक्क विधानसभा परीषेदेत झुगार खेळत असतानाच व्हिडिओ समोर आला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे…
राजकीय द्वेषातून अर्धवट व्हिडिओ टाकून माझी व सरकारची बदनाम करण्याचा प्रयत्न… कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. मी वरच्या मजल्यावर बसलो होतो त्यामुळे खालच्या मजल्यावर काय काम चालू आहे व योजना जाणुन घेण्यासाठी युट्यूबवर माहिती घेत असताना मध्येच यम्मी खेळाची जाहीर असल्यानं ती क्रिस्पट करत असतानाचा व्हिडिओ काढण्यात आला आहे त्यापुढचा व्हिडिओ मात्र दाखवल्या न गेल्याने संभ्रम निर्माण झाला असावा असे स्पष्टीकरण कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे…
सध्या महाराष्ट्रात बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमाफी साठी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मात्र टाईमपास करत आहेत त्यामुळे विरोधकांकडून चौकशीची व कारवाईची मागणी केली जात आहे… तर शेतकरी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत आहेत.



