Uncategorizedनाशिक ग्रामीणलोकल बातम्या

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नांदगाव तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान

  1. ।वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नांदगाव तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसानवेगवान मराठी : दि १ ४ ऑगस्ट
  2. मारुती जगधने
  3. तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागामधील शेतकरी सध्या खरीप हंगामात हरीण व रानडुक्कर यांच्या हल्ल्यामुळे त्रस्त झाले आहेत. बागायती तसेच जिरायती शेतीतील पिके या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उध्वस्त होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे.धान, मका, भुईमूग, सोयाबीन, ऊस अशा पिकांवर हरीण व रानडुक्कर झुंडीने येऊन हल्ला करतात. दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या वेळी शेतात घुसून ही पिके खाणे, पिके उपटणे व तुडविणे यामुळे शेतकऱ्यांचे मेहनतीचे पीक नष्ट होते.

    स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, वनविभागाकडून काही प्रमाणात उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या अपुऱ्या आहेत. शेतकऱ्यांनी अनेकदा संरक्षणासाठी तारजाळ, ड्रम वाजविणे, विजेरी दिवे, पुतळे उभे करणे अशा उपाययोजना केल्या, मात्र वन्य प्राण्यांचा उपद्रव कायम आहे.

    या समस्येमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून, तातडीने प्रभावी उपाययोजना न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

    शेतकरी वर्गाने वनविभाग व प्रशासनाकडे नुकसान भरपाईसह दीर्घकालीन संरक्षण उपाय योजना राबविण्याची मागणी केली आहे.

    याबाबत मांडवड येथील शेतकरी सुपडू जाधव ( supadu Jadhav )म्हणतात की माझ्या शेतात 40 ते 50 हरीण यांनी धुमाकूळ घातला आहे माझ्या शेतात तिल 4 एकर मका पीक खाऊन फस्त केली आहे. तरी काय करावे लागेल मार्गदर्शन केले तर बरे होईल तसेच बातमी टाकता येईल तर बरे होईल.अशी प्रतिक्रिया जाधव यांनी व्यक्त केले

    त्यानंतर वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी खरीपानंतर रब्बी आणि उन्हाळी पिके घेणेदेखील बंद केले आहे कारण की हा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!