Uncategorized

या तालुक्यात दिव्यामुळे लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा व 3 शेळ्यांचा देखील होरपळून मृत्यू झाला .

Nandgaon news

या तालुक्यात दिव्यामुळे लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा व 3 शेळ्यांचा देखील होरपळून मृत्यू झाला .

वेगवान मराठी : मारुती जगधने
दि .30 डिसेंबर २०२५

नांदगाव (जि. नाशिक) : नांदगाव तालुक्यातील हिसावळ शिवारात एका दुर्दैवी अपघातात ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत महिलेचे नाव अहिल्याबाई गणपत मोरे (वय ८५) असून त्या हिसावळ शिवारातील रहिवासी होत्या. सोमवारी (दि. २९ डिसेंबर २०२५) रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास त्या शेत गट क्रमांक ३७३ मधील कोपीत झोपलेल्या असताना, कोपीमध्ये असलेल्या दिव्यामुळे अचानक आग लागली. या आगीत त्या गंभीररीत्या होरपळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती नातेवाईक धर्मा बाळू मोरे (वय ३८, व्यवसाय: मजुरी, रा. हिरेनगर-गडारेवाडी, ता. नांदगाव) यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात दिली.या घटनेमध्ये झोपडी जळून खाक झाली त्यासोबत संसार उपयोगी वस्तू अंथरून पांघरून भांडे धान्य आणि एक शेळीचा मृत्यू देखील झालेला आहे एक शेळी गंभीर जखमी झाले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते घटनेतील माहितीनुसार नांदगाव
पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू अहवाल क्रमांक १०३/२०२५ दाखल केला आहे.

रामू बिन्नर यांच्या कडून मिळालेल्या माहिती वरूनहिरे नगर ला येथे झोपडीला लागलेल्या आगीत 3 शेळ्यांचा देखील मृत्यु झाला आहे
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर करत असून, ही घटना अपघाती स्वरूपाची असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!