. . . . येथील दिव्यांग मेळाव्यात माजी मंत्री बच्चू कडू यांचा इशारा
Nandgaon News
. . . येथील दिव्यांग मेळाव्यात माजी मंत्री बच्चू कडू यां चा इशारा .
नांदगाव : ॥ दि . 4 ऑक्टोंबर 2025 ॥
शेतकरी, मच्छीमार, शेतमजूर, दिव्यांग तसेच ग्रामीण समाजातील सर्व वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी नागपूर येथे मोठा मोर्चा घेण्यात येणार असून जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही, असे ठाम मत माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
ते नांदगाव येथील जैन धर्मशाळेत आयोजित दिव्यांग मेळावा या कार्यक्रमात बोलत होते.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दौरे सुरू असून शेतकरी आणि मजुरांचे प्रश्न प्रखरपणे मांडले जात आहेत. नागपूर अधिवेशनाच्या काळात या मागण्यांसाठी व्यापक आंदोलन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शालेय पोषण आहार समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी आश्वासन
या मेळाव्यात उपस्थित शालेय पोषण आहार समितीच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन बच्चू कडू यांनी दिले. यावेळी शालेय पोषण आहार संस्थेच्या आधारवड महिला प्रतिनिधींनी त्यांना निवेदन सादर केले.
दिव्यांगांसाठी लढा सुरूच
बच्चू कडू यांनी पुढे बोलताना सांगितले की,
- दिव्यांगांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
- दिव्यांगांना रोजगार, शैक्षणिक सोयी, सवलती व अधिकार प्रत्यक्षात मिळाले पाहिजेत.
- प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग आणि शेतकरी या दोन्ही घटकांचा प्रश्न संसद व विधानसभेत सातत्याने मांडत राहील.
या मेळाव्याला दिव्यांग नागरिक, शेतकरी बांधव, महिला व युवकांची मोठी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.



