नाशिक ग्रामीणमहाराष्ट्र,देश

नाशिक चे [ पालक मंत्री ] संकट मोचन कोण ?

Nashik Palak mantri news

नाशिक जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री असूनही बाहेरील पालकमंत्री का?

वेगवान नेटवर्क / मारुती जगधने

नाशिकः, ता. 20 आॅगस्ट 2025  जिल्ह्यातील चार कॅबिनेट दर्जाचे मंत्री राज्य शासनात काम पाहत असूनदेखील जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मात्र बाहेरील मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहे ? यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नाशिक जिल्ह्यात कृषी, सहकार, उद्योग, आरोग्य आदी विविध विभागांचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत. स्थानिकांना अपेक्षा होती की जिल्ह्याच्या विकास कामांचा वेध घेण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी याचपैकी एखाद्याला पालकमंत्री करण्यात येईल. मात्र राज्य सरकारने बाहेरील एका मंत्र्याची निवड करून पालकमंत्रिपद सोपविले?

याबाबत नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात नाराजीची भावना आहे. “जिल्ह्यातील मंत्री असताना बाहेरील मंत्र्याला पालकमंत्रिपद दिल्याने विकास योजनांचा वेग कमी होतो आणि थेट संपर्क साधण्यात अडचणी येतात,” असे काही जनप्रतिनिधींचे म्हणणे आहे.

राजकीय तज्ज्ञांच्या मते, जिल्ह्याच्या सत्ताधारी- विरोधकातील समीकरणे, आगामी निवडणुका आणि सत्तारूढ पक्षातील आंतरिक समन्वय या कारणांमुळे अशी नेमणूक करण्यात आली असावी. त्यामुळे नाशिककर मात्र प्रश्न विचारत आहेत की “चार मंत्री जिल्ह्यात असूनही आपल्याला बाहेरचा पालकमंत्री का? असा सवाल राजकीय गोटात विचारला जातो .

नामदार गिरीश महाजन हे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा (तापी, विदर्भ आणि कोकण), कुंभमेळा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत. ते नाशिकचे पालकमंत्री ? तथा संकट मोचन होतील काय?

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!