महाराष्ट्र,देश

माणिकराव कोकाटेंना जेल होणार ? व्हिडीओ पहा

वेगवान नेटवर्क

नाशिक, ता. 18 डिसेंबर 2024 राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. सिन्नरचे आमदार आणि राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा खाते काढून घेण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा चेंडू सध्या राज्यपालांकडे आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याप्रकरणी कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. हीच शिक्षा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे.

या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, कोकाटे सध्या मुंबईतील एका रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अटक वॉरंट जारी झाल्यानंतर कोकाटे राजीनामा कधी देणार, यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत होती. अखेर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपला राजीनामा सादर केल्याने राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!