
या परिसरात मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान
वेगवान मराठी :मारुती जगधने
[दिनांक 29 ऑगस्ट 2025 ]नांदगाव तालुका :दिवसभर आकाश झापाळलेले होते . दोन दिवस विजांचा कडकडाट होता त्यामध्ये वीज पडून मूळडोंगरी पांढरवाड येथे एक महिलेचा मृत्यू झाला चार जण जखमी झाले .तसेच मल्हारवाडी येथे वीज पडून चार शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे .
दिः२९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्नेवस्ती जामदरी परिसरासह इदिरानगर (तालुका नांदगाव ) भागात लहान मोठ्या-नाल्यांना अचानक पूर आला. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या पूरपरिस्थितीत चैत्राम पंढरिनाथ तांबे, भिवा काशीनाथ व्हडगर, पोपट व्हडगर, मांगु रामा तांबे, धर्मा नंदा व्हडगर, बाबासाहेब भगवान बेरकर, भगवान काशीनाथ व्हडगर तसेच भिलाजी दगडु तांबे (इदिरानगर) यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली.
झालेल्या अतिवृष्टीने व पूरामुळे हिरवी मिरची टमाटे, मका व भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज असून, अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
- नांदगाव तालुक्यातील जामदरी परिसराच्या एकाच भागामध्ये ही अतिवृष्टी झालेली आहे येथील शेतकरी या झालेल्या अतिवृष्टी ने चिंता दूर झाले .या संदर्भात महसूल प्रशासनाने जामदरी परिसरामध्ये भेट देऊन पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे .



