नाशिक ग्रामीण

सिन्नर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या जेरबंद : खा. राजाभाऊ वाजे यांनी दखल घेतल्याने कारवाईला वेग…

वेगवान " च्या बातमीची दखल : बिबट्याचा बंदोबस्तासाठी वनाधिकारी व खासदार - आमदार लागले कामाला...!! 

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

” वेगवान ” च्या बातमीची दखल : बिबट्याचा बंदोबस्तासाठी वनाधिकारी व खासदार – आमदार लागले कामाला…!!

        सिन्नर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या जेरबंद : खा. राजाभाऊ वाजे यांनी दखल घेतल्याने कारवाईला वेग…

             सिन्नर : दि , 17 सप्टेंबर 2025 — गेल्या वर्षभरात तालुक्यातील बहुतांश ठिकाणी बिबट्याचा बिनधास्त वावर वाढला असून बिबट्याच्या हल्ल्यात अनेक निष्पाप जीव बळी गेले आहेत. भरदिवसा गजबजलेल्या भागात बिबट्याची हिंमत दिसून येत आहे. मानव वस्तीवर दिवसेंदिवस बिबट्यांचा वावर वाढतच असून एकामागून एक असे हल्ले दररोज होत आहे.. मागील एकाच आठवड्यात पंचाळे येथे दोन. खडांगळीत एक बिबट्याच्या हल्ल्यात निष्पाप, निरागस बालकाचा मृत्यू झाला आहे यात अनेक गावांमध्ये शेतकरी कामात व्यस्त असतात व पिकाच्या आडोसा घेऊन दबा धरून बसलेल्या बिबट्या अचानक हल्ला करून जबर जखमी झाले आहेत. तालुक्यातील सर्वंच भागात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे अंधार होताच कुटुंबातील व्यक्तींना घरात कोडुन घ्यावं लागतं…

     या अनुषंगाने शरद पवार गटाचे नेते श्री.उदय सांगळे यांनी मागील आठवड्यात वनाधिकारी यांची भेट घेतली होती व आता पर्यंत बिबट्या च्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाला आर्थिक हातभाराची शासनाकडून अपेक्षा आहे ती मदत त्वरित मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.. व बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी लेखी स्वरूपात केली आहे.

         शेवटी माणसं जगले पाहिजे अन् बिबटे वाचले पाहिजे असे असले तरी त्यांना वाचवण्यासाठी मानवाच्या जिवावर उठलेल्या या हिंस्र प्राण्यांना आवर घालण्यासाठी कठोर पावले उचलली जाणं गरजेचं आहे. तालुक्यातील जनतेचा रोष लक्षात घेऊन सिन्नर चे भुमी पुत्र व जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुढाकार घेतला असून या संदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक घेतली आहे. या अनुषंगाने काही महत्त्वाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणं अत्यावश्यक आहे.. श्री.वाजे यांनी या संदर्भात वैयक्तिक लक्ष केंद्रित केले आहे व वनाधिकारी यांना खास सुचना केल्या आहेत त्यामुळे सिन्नर वन अधिकारी व कर्मचारी हे कामाला लागले असुन गेल्या दोन दिवसांपासून खडांगळी व पंचाळे परिसरात ठान मांडुन बिबट्याचा शोध घेतला जात आहे परंतु कधी ऊसात तर कधी मकाच्या पिकांत लपवून बसलेला बिबट्याने दोन दिवस चकवा देत होता परंतु मिठसागरे शिवारात माजी पोलीस पाटील यांच्या वस्तीपासून जवळपास असलेल्या रामदास चतुर यांच्या शेतात मंगळवारी दुपारी दोन वाजता दरम्यान अखेर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले व बिबट्या जेरबंद करून नाशिक येथील टि.टि.सी.येथे रवाना करण्यात आले आहे. परंतु बिबट्याची दहशत अजून संपलेली नाही त्यामुळे गावोगावी ठराविक अंतरावर पिंजरा बसवण्याची मागणी होत आहे..
      बिबट्या आणि मानवी जीवन धोक्यात, खासदार राजाभाऊ वाजेंनी घेतली गंभीर दखल ,,, 

        उपवनसंरक्षक सावर्डेकर यांच्यासोबत खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रदीर्घ चर्चा..

मागील काही महिन्यात बिबट्याचा हल्ला, बिबट्याचे दर्शन, जीवितहानीच्या अनेक घटना सातत्याने नाशिक आणि आसपासच्या परिसरात घडत आहेत. मागच्या महिन्याभरात चिमुकल्यांना बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावल्याची घटना घडली आहे. मानवी जिवासोबतच बिबट्याच्या देखील जीविताला यामुळे निर्माण झालाय. याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रश्नाचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने त्यांनी पाऊले टाकायला सुरवात केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी उपवनसंरक्षक सिद्देश सावर्डेकर यांच्यासोबत सोमवारी (दि. १५ सप्टेंबर) बैठक घेत प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी अल्पकालीन आणि दीर्घकालीन काय उपाययोजना करणे शक्य आहे याबाबत चर्चा झाली.

नाशिक तालुक्यात वडनेर पाठोपाठ सिन्नर तालुक्यातील खंडांगळी याठिकाणी देखील बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मागील आठवड्याभरात ४ ते ५ ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याच्या तर असंख्य ठिकाणी दर्शन दिल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील काही वर्षात बिबट्याचा वाढलेला अधिवास आणि मानवी वस्तीमधील संचार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही समस्या अत्यंत गंभीर होत चालली असून यातून मानवी आणि बिबट्याच्या देखील जीविताला प्रश्न उपस्थित झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, इगतपुरी, निफाड आणि काही प्रमाणात दिंडोरी आणि त्रंबकेश्वर तालुक्यातील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव तालुक्यातील असंख्य गावात अक्षरशः दहशतीचे वातावरण आहे. अंधार पडल्यानंतर बंदीस्त करून घ्यायची वेळ नागरिकांवर येत आहेत. त्यातच लोडशेडिंगमुळे रात्रीच्यावेळी शेतीला पाणी द्यायला जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. याआधी रात्रीच्यावेळी बिबट्या हल्ला करत होता मात्र मागील काही घटनांमधून दिवसादेखील बिबट्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. यात लहान चिमुकले बिबट्यासाठी सोप्पे शिकार ठरत आहेत. यामुळे दहशतसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

बिबट्याच्या मुक्त संचारामुळे आणि वाढत्या अधिवासामुळे निर्माण होत असलेल्या या गंभीर समस्येबाबत खासदार राजाभाऊ वाजे मैदानात उतरले असल्याचे बघायला मिळत आहे. याबाबत काय उपयोजना करता येतील याबाबत खासदार वाजे यांनी पाऊले टाकायला सुरवात केलीये. याबाबत त्यांनी स्थानिक परिस्थिती जाणून घेत त्याबाबत उपवनसंरक्षक सिद्देश सावर्डेकर यांच्यासोबत बैठक घेत चर्चा केली. यावेळी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांच्या बाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच, सोबत मिळून या समस्येवर तोडगा काढण्याबाबत एकमत झाले.

*अल्पकालीन उपयोजना*

– नागरिकांचे समोपदेशन आणि प्रशिक्षण
– ट्रॅकिंग यंत्रणा कार्यान्वित करणे
– आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बिबट्याचा धोका ही बाब समाविष्ट करणे
– पिंजाऱ्यांची संख्या वाढवणे
– अधिवसाची माहिती मिळवण्यासाठी स्पेशल ड्राइव्ह घेणे
– व्यवस्थापनासाठी संस्थांची मदत घेणे तसेच स्थानिक तरुणांना प्रशिक्षित करून त्यांची मदत घेणे

*दीर्घकालीन उपाययोजना*

– रेस्क्यू सेंटरची निर्मिती करणे
– संख्या नियंत्रित करण्यासाठी उपयोजना करणे
– जुन्नरच्या धर्तीवर विशेष बाब म्हणून शासकीय मान्यतेने समस्येवर उपयोजना करणे
– जगातील पातळीवर याबाबत अभ्यास करून त्या उपयोजना लागू करणे

खासदार राजाभाऊ वाजे यांनी स्थानिक परिस्थिती जाणून घेतली तसेच तज्ञ मंडळींसोबत चर्चा केली. यासह उपवनसंरक्षक सावर्डेकर यांच्यासोबत बैठक घेऊन देखील प्राथमिक स्थरावर या समस्येवर काही उपाययोजना करता येतील यावर लक्ष केंद्रित केलंय. आगामी काही दिवसात याबाबत सखोल अभ्यास करून पाऊले टाकण्याचा त्यांचा मानस असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

बिबट्या ही समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. यावर ठोस उपाययोजना करावी लागणार आहे. गावागावात दहशतीचे वातावरण आहे. या भीतीचे रूपांतर उद्रेकात व्हायला वेळ लागणार नाही. बिबट्याचा वाढलेला अधिवास आणि मानवी वस्तीमधील मोकळा संचार यामुळे मानवी आणि बिबट्याच्या देखील जीविताला धोका निर्माण झालाय. त्यामुळे यावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी पाऊल टाकली जाणार आहे. याबाबत दिल्लीपर्यंत लढाई करावी लागणार आहे, त्यादृष्टीने पाऊल टाकायला आम्ही सुरवात केलीये.

बिबट्याला पकडा आणि जनता वाजवा… या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष कैलास दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते.. श्री.दातीर यांनी याबाबत अनेक वेळा आवाज उठवला होता.

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!