नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

केंद्र सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची तरतूद नाही – राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

Nandgaon News

 


केंद्र सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची तरतूद नाही – राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

वेगवान : मराठी : मारूती जगधने 
॥ दि. ४ ऑक्टोबर २०२५ ॥

नांदगाव :
केंद्र सरकारच्या दुष्काळ मॅन्युअल २०१७ मध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची कुठलीही तरतूद नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना भरीव मदतीची शक्यता कमी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी केला.

बोरसे यांनी केलेले मुख्य आरोप व निरीक्षणे :

  • केंद्राचे पथक अद्याप राज्यात आलेले नाही.
  • केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना फक्त तुटपुंजी मदत देऊन थातुरमातुर दिलासा देत आहेत.
  • NDRF-SDRF योजनेंतर्गत केंद्र ७५% तर राज्य २५% निधी देते; मात्र खरीप हंगाम २०२५ साठी राज्य सरकारने मदतीत कपात केली असून, कमाल ३ ऐवजी फक्त २ हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • शेतकऱ्यांच्या हक्काचा जीएसटी परतावा ६,४१८ कोटी रुपये आगाऊ स्वरूपात राज्याला देऊन केंद्राने उदासीनता दाखवली.

सध्याच्या मदतीची मर्यादा :

  • जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर ८,५०० रुपये मदत.

ओला दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना मिळणारे दिलासे :

  • कर्जमाफी / कर्ज फेडीला मुदतवाढ
  • पिक विमा लाभ
  • जमीन महसूल सूट
  • शैक्षणिक शुल्क माफी
  • वीज बिल माफी
  • घर, जनावरे, शेततळे नुकसान भरपाई
  • रोजगार हमी अंतर्गत कामे
  • चारा छावण्या, मोफत अन्नधान्य
  • आरोग्य शिबिरे व जीवनावश्यक वस्तू

या सर्व सुविधा अद्याप मिळालेल्या नसल्यामुळे शेतकरी हवालदिल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी :
सरकारने कागदी घोडे न नाचवता ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करून विशेष पॅकेज व सरसकट कर्जमाफी द्यावी.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!