शेती

खिर्डी साठे, डोंगरगावं ल पा तलाव क्षमता वाढवा :- जलहक्क संघर्ष समिती ची मागणी

खिर्डी साठे, डोंगरगावं ल पा तलाव क्षमता वाढवा :- जलहक्क संघर्ष समिती ची मागणी

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला :दिनांक: 5 डिसेंबर :येवला तालुक्यातील शेती सिंचनाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले डोंगरगावं लपा तलाव व खिर्डी साठे लपा तलाव यांची क्षमता वाढ व दुरुस्ती करावी, या दोन्हीही तलावात निम्म्याने गाळ साठला आहेत.धरण रेषा व सांडवा दुरुस्ती करणे गरजेचे आहे, त्या साठी
महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम (MIIP) मध्ये तातडीने समाविष्ट करून प्रलंबित कामे पूर्ण करावी अशी मागणी, जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी केली आहे.

या प्रकल्पातील मुख्य कालवे आणि उपकालव्यांची कामे दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सिंचन सुविधांचा अभाव असल्याने पिकांचे उत्पादन घटते असून शेतीवर थेट परिणाम होत आहे. या प्रकल्पांमुळे हजारो एकर क्षेत्राला पाणी मिळू शकते, परंतु अपूर्ण कामांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळत नाही, असे सोनवणे यांनी निवेदनात म्हंटले आहे.

” सरासरी पर्जन्य मानात वाढ व मांजरपाडा प्रकल्पने पाण्याची उपलब्धता वाढली आहे.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची गरज आहे”
– भागवतराव सोनवणे :- जलहक्क संघर्ष समिती, येवला.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!