पत्रकारांवर हल्ल्यामुळे खळबळ — नांदगाव तालुक्यात संतापाची लाट!
Nandgaon Manmad news
- पत्रकारांवर हल्ल्यामुळे खळबळ — नांदगाव तालुक्यात संतापाची लाट!
वेगवान मराठी : मारुती जगधने
[दि . 20 सप्टेंबर 2025 ]
नांदगाव राज्य नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. त्र्यंबकेश्वर येथे गेलेल्या काही पत्रकारांवर काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व पत्रकार वर्गात भीतीचं वातावरण पसरलं असून, संतापाची लाट उसळली आहे.दरम्यान पत्रकारांच्या वतीने मनमाड येथे मनमाड पोलीस विभागाचे पोलीक उपअधिक्षक बाजीराव सोनवणे आणि नांदगाव येथे पोलीस निरीक्षक भदाणे यांना नांदगाव पत्रकारांच्या व प्रेस फोटो ग्राफर नांदगांव शहर व ग्रमीण च्या वतीने निवेदन देण्यात आले
पत्रकार संघटनांनी एकत्र येत पोलिस प्रशासनाकडे धडक देत तातडीने हल्लेखोरांना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. “पत्रकारांवर हल्ले थांबले नाहीत तर मोठं आंदोलन उभारलं जाईल,” असा इशारा देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, हा हल्ला एका महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पत्रकारांवर होत असलेले वारंवार हल्ले लोकशाहीवरील आघात असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
2019 मध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती, मात्र त्यानंतर योग्य कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा अशी हिंसक घटना घडली आहे.
स्थानिक पत्रकारांचे मत :
“पत्रकार म्हणजे समाजाचं आरशासारखं प्रतिबिंब. जर पत्रकारच सुरक्षित नसतील तर लोकशाही कशी सुरक्षित राहणार? प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून गुन्हेगारांना लोखंडी सलाखांआड टाकावं,” अशी प्रतिक्रिया समस्त पत्रकारांनी दिली.
सध्या नांदगाव तालुक्यातील पत्रकार व प्रेस फोटो ग्राफर आक्रमक मूडमध्ये असून, दोषींना अटक न झाल्यास उग्र आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे .
नांदगाव तालुक्यातील पत्रकारांनी नांदगाव येथील पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांना निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केला आहे याप्रसंगी नांदगाव मनमाड शहरातील व नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुसंख्य पत्रकार यावेळी उपस्थित होते .


