अमरधाम जुने नाशिक स्मशानात भुतबाधेवर खात्रीशीर इलाज ?
वेगवान मराठी : मारूती जगधने
नाशिक दि . 17 सप्टेंबर 2025
संभाजी ब्रिगेड, नाशिक यांच्या वतीने शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १०.३० ते १.०० या वेळेत नाशिक येथील अमरधाम स्मशानभूमी परिसरात ‘अंधश्रद्धा निर्मूलन प्रात्यक्षिक कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील पसरलेल्या अंधश्रद्धा, अपप्रवृत्ती व खोट्या धार्मिक प्रथांना आळा घालणे हा आहे. विशेषतः जेंव्हा बाबा घेतो ताबा, भटबाधा व भुतबाधेवर खात्रीशीर इलाज या विषयावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून समाजप्रबोधन केले जाणार आहे.
कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक सादरकर्ते म्हणून. कृष्णा चांदगुडे व . महेंद्र दातरंगे (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती) हे उपस्थित राहणार आहेत. या माध्यमातून लोकांच्या मनातील भीती व चुकीच्या समजुती दूर करून विज्ञानवादी दृष्टीकोन निर्माण करण्याचा प्रयत्न होईल.
युगपुरुष, समाजसुधारक व थोर ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे प्रेरणादायी विचार या कार्यक्रमामागे मार्गदर्शक आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांना विज्ञानवादी जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळावी हा प्रमुख हेतू आहे.
संभाजी ब्रिगेड, नाशिकच्या या उपक्रमाला स्थानिक नागरिक, कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे. आयोजकांनी “विद्यानवादी जीवन जगण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे” असे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाची माहिती दिनांक : शनिवार, २० सप्टेंबर २०२५वेळ : रात्री १०.३० ते १.०० ठिकाण : अमरधाम स्मशानभूमी, जुने नाशिक
या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला अंधश्रद्धेविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळून वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.



