नाशिक शहर

उद्धव ठाकरे गट व मनसे यांची” युती ” ,,, ! आज नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा निघणार…

मोर्चातून काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध करणार

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर :  दि , 12 सप्टेंबर 2025 —   ” एकत्र आलो,,, ” एकत्र राहण्यासाठी… !  उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे व एक नवीन ऊर्जा मिळाली आहे. परंतु दोन भाऊ एकत्र येणार… या चर्चेला पूर्णविराम कधी मिळणार याकडे अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे . दोन भावांच्या मनोमिलन झाले पण कार्यकर्ते सुद्धा मनापासून एकत्र आले तर त्याचे पक्षाच्या दृष्टीने चांगले परिणाम दिसून येतील या सर्व गोष्टींचा अभ्यास करून दोन्ही पक्षांनी जिल्हा व तालुका पातळीवर एकत्र येऊन काम सुरू केले आहे. याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यांत आंदोलनाच्या माध्यमातून ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व मनसे या दोन्ही पक्षांनी संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून त्यासाठी सिन्नर तालुक्यातील दोन्ही पक्षांनी जोरदार कामाला सुरुवात केली आहे. मोर्चा कशासाठी. व कोणासाठी या संदर्भात संपूर्ण माहिती पत्रक काढून प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचवले जात आहेत.. या साठी मनसे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष अमोल जाधव. सिन्नर तालुका अध्यक्ष रामदास खैरनार .          पदाधिकारी  तसेच   उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे समर्थक दिनेश जाधव.नवनाथ वाकचौरे कार्यकर्ते   सक्रिय आहेत त्याचप्रमाणे ठाकरे गटाच्या माध्यमातून या भव्य मोर्चासाठी  मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे..

( मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल जाधव  ,ठाकरे गटाचे दिनेश जाधव व इतर पदाधिकारी हे माहिती पत्रक देतांना …  क्षणचित्रे… )

      ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत.. दोन्ही नेते युती संदर्भात सकारात्मक असुन काल या दोन्ही भावांची प्रदिर्घ चर्चा झाली त्यात युती च्या पार्श्वभूमीवर व आगामी निवडणुकीत जागा वाटप संदर्भात चर्चा झाली असल्याची सुत्रांची माहिती आहे.. एकीकडे दोन्ही नेते युती साठी चर्चा करीत असतांनाच नाशिक मध्ये दोन्ही पक्षांच्या संयुक्त विद्यमाने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे त्यामुळे नाशिक चा मोर्चा निर्णायक ठरणार व युती साठी ” नांदी ठरणार.. . कारण दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे…

“ शासनाला जाग आणण्यासाठी अंधारातुन उजेडाकडे ” ,,,

,,,       चला एकत्र येऊ या … !

नाशिककरांनो, आपल्या भविष्याला व मुलांच्या उद्याला मिळणाऱ्या समस्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. तर वाट कशाची बघता हा मोर्चा सत्तेसाठी नाही हा सर्वांसाठी सत्याचा व जगण्याचा लढा आहे।

स्मार्ट मीटर व खाजगीकरण नागरिकांना बळजबरी, विजेचे भविष्य मुठभर कंपन्यांच्या ताब्यात.

नाशिककरांनो – उठा ! काळा झेंडा घ्या, काळा रंग धारण करा आणि या !

काळोखातून उजेडाकडे – नाशिकच्या लढयासाठी एकत्र या !

या भव्य  जनआक्रोश मोर्चा १२ सप्टेंबर, सकाळी ११ वाजता बि. डी. भालेकर हायस्कूल, शालिमार पासून जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक या मार्गाने होणार असल्याचे माहिती मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल जाधव यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मोर्चात सहभागी होण्यासाठी —

— शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नाशिक शहर व संपूर्ण जिल्हा यांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.

 

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!