नाशिक ग्रामीण

मानवी कृत्याचा कळस,वीस कुत्र्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न

वीस कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्याचा प्रकार

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ

सटाणा दि.३१ऑगस्ट २०२५

अंबासन (ता.बागलाण)येथे
धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, गावातील एका डुक्करमालकाने स्वतःच्या डुकरांचे रक्षण करण्याच्या नावाखाली गावातील कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सुमारे वीसहून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. काही मांजरांचाही बळी गेला आहे. ही घटना गावातील अंगणवाडी केंद्राजवळ व चौकात घडल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

गावातील अनेक नागरिकांनी आरोग केरत्र आहे की, डुक्कर मालकरने आपले डुक्कर सुरक्षित राहावेत यासाठी गावात काहीतरी विषारी पदार्थ टाकून कुव्यांना ठार मारण्याचे कृत्य केल्याचा सकुतदारांनी पुढे येत आहे. त्यामुळे गावात प्राणीप्रेमोंमध्ये संतापाची लाट आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीने जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, दोषीवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. सकाळी युवकांनी अंगणण्डडी परिसरात व सावता चौकात काही कुत्रे व मांजर मृतावस्थेत आढळले, पाच भागात अंगणवाडीत लहान मूकूर जात असल्याने कुत्रे नेमकी कशाने मृत अवस्थेत आवळली याची ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी एका कुत्रीने प्रशांत भामरे यांच्या शेडमध्ये गोंडस पिलांना जन्म दिला होता. अशा कुत्र्यांचाही यात मृत्यू झाला. ग्रामस्थानी माहिती घेतली असता गावातील एका डुक्कर मालकाने कुत्रे डुक्करांना त्रास देत असल्याने

गेल्या दोन तीन दिवसांपासून काहीतरी विषारी औषध देऊन कुत्र्यांचा काटा काढण्यासाठी धक्कादायक प्रकार केला आहे, यासंदर्भात स्वतः डुक्कर मालकाने पोलीस ठाण्यात कबुली दिली आहे. परिणामी परिसरात फिरणाऱ्या अनेक कुत्र्यांनी ते आन्न खाल्ले आणि काही वेळातच तडफडून मायू‌मुखी पडले. मृत्यूमुखी पडलेले कुवे आणि मांजरी काही काळ परिसरात पडून होते. जायखेडा पोलिसांनी पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकारी डि.एस. पठाडे यांनी मांजरासह कुत्र्यांचे शवविच्छेदन केले.


ग्रामसभेत डुक्करांचा विषय नेहमीचाच

वेधील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत कायमच शेतीचे नुकसान करणाऱ्या डुक्करांच्या प्रश्न उपस्थित निर्माण केला जात होता. मात्र डुक्कर मालकांकडून कुठलाही ठोस बंदोबस्त केला जात नव्हता. उलट शेतकऱ्यांना डुक्कर मालकांकडून दमदाठी होत असल्याचे शेतकन्यांचे म्हणणे आहे.

ग्रामसभेतही डुक्कर मालकांनी सात दिवसांत गावातील डुक्कर हरपार करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनानेही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!