नाशिक ग्रामीण

नाशिक : ,,, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अनेक तालुक्यांत पावसाची जोरदार हजेरी.. बळीराजा सुखावला — !

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

 नाशिक / सिन्नर: दि, 18 ऑगस्ट 2025 — जुन महिन्यात पेरणी झाली परंतु या काळात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला त्या पावसावर कसेबसे पिके तग धरुन होते.. ऐन फुलांवर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत सोयाबीन असतांनाच पावसाने दडी मारल्याने घासा तोंडाशी आलेला घास हिरावला जातोय असे चित्र दिसत होते गेल्या आठवड्यात राज्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला होता पण नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा होती सर्वत्र होत असलेल्या पावसामुळे आज उद्या आपल्या ही भागात पाऊस पडल अशी आशा लावून बसलेले नाशिक करांची प्रतिक्षा काल दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने संपली आहे.. रविवारी दुपारी नाशिक जिल्ह्यातील येवला, लासलगाव, निफाड, सिन्नर, या तालुक्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर ब-याच गावात अजुनही पावसाचे रिमझिम सुरुच असुन अनेक गावांमध्ये पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला असला तरी ताण पडलेल्या पिवळ्या पिकाची नुकसानही शेकडो एकर क्षेत्रावर असलेल्या सोयाबीन या पिकाला बसला आहे.. उशिरा का होईना परंतु वेळेवर पावसाचं पुनरागमन झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जिव भांड्यात पडला होता त्यांना याचा दिलासा मिळाला आहे..

 लासलगाव तालुक्यातील धामोरी.विचुंर.मानोरी.तर येवला येथील कोटमगाव.रवंदा.मालखेडे.पाटोदा, सिन्नर तालुक्यातील पांगरी,वावी, पंचाळे, देवपूर, धारण गाव, शिंदेवाडी.शहा.कारवाडी.रामपुर.सायाळे, पाथरे, भरतपूर,मलढोण.ह्या सर्वाधिक गावातील क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर निफाड तालुक्यात सायखेडा.नैताळे.माळसाकोरे.हिवरगाव. भेडांळी, या गावांना पावसाने चांगलेच धुतले आहे.. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या हा पाऊस बहुतेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सर्वदूर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे अजुन काही दिवस पावसाचा जोर कायम राहील असे हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले आहे,

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!