महाराष्ट्र,देश

रेल्वे स्थानकाच्या विकास आराखड्याला गती द्या – मंत्री छगन भुजबळ

रेल्वे स्थानकाच्या विकास आराखड्याला गती द्या - मंत्री छगन भुजबळ

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला,दि.८ऑगस्ट:-आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यासाठी येवला रेल्वे स्थानकावरील विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. अमृत भारत स्टेशन अंतर्गत येवला रेल्वे स्थानकातील विकास आराखड्याला गती देऊन काम सुरू करण्यात यावी अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलत होते.

यावेळी मध्यरेल्वेचे सिनियर इंजिनियर देवेंद्र, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, कुमार, स्टेशन प्रबंधक योगेश कोल्हे, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, अनेक दिवसांपासून येवला रेल्वे स्थानकाच्या प्रश्नावर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यानुसार आता अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत रेल्वे स्थानकाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्याच्या मंजुरीचे काम अंतिम टप्यात असून या आराखड्यातील कामांना सुरुवात करण्यात येईल. तत्पूर्वी या रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ चे काम, प्लॅटफॉर्म १ ची लांबी वाढविण्याचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात यावी अशा सूचना त्यांनी केल्या.

ते म्हणाले की, आगामी कुंभमेळ्याच्या धर्तीवर भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी रेल्वे स्थानकावरील सर्व विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. येवला रेल्वे स्थानकावर खतांचे रॅक उतरविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. याबाबत गुड्स शेड, प्लॅटफॉर्म वरील शेड्स, हाय लेव्हल प्लॅटफॉर्म, शेड यांची कामे पूर्ण करण्यात यावी. या रेल्वे स्थानकावर येणाऱ्या मालवाहतूक गाड्यांना शहराला वळसा घालून यावे लागते. त्यामुळे येवला शिवूर राष्ट्रीय महामार्ग रेल्वे उड्डाणपुलापासून रेल्वे मालधक्का समांतर रस्ता तयार करण्यात यावा. येवला शहराचा विकास झपाट्याने होत आहे. येथील लोकसंख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादृष्टीने याठिकाणी अधिक गाड्यांना थांबा देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून त्यासाठी पहिल्यांदा रेल्वे प्रशासनाने सर्व पायाभूत सुविधा तातडीने विकसित करण्यात याव्यात अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केल्या

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!