अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या कामांच्या गुणवत्ता संशयाच्या भोवऱ्यात ,,, !
लाखो रुपये खर्च करून कामात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून आले....

- वेगवान मराठी / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि 10 ऑगस्ट 2025 — पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी लोखो रूपयांचा निधी मिळुन हि या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय…
नाशिक रोड येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या कामातील गुणवत्तेवरून जन्मोत्सव समिती व प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक = समाधान बागल
नाशिक रोड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकामध्ये दुरुस्तीच्या कामासाठी भाजपचे सध्याचे जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर तत्कालीन विधान परिषद आमदार असताना 30 लाख निधी मंजूर झालेला होता.31 मे 2025 च्या अगोदर स्मारकाचे काम पूर्ण न झाल्यास त्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा समिती व प्रहार जनशक्ती पक्ष दोघांच्या वतीने देण्यात आला आणि त्यांच्या या आंदोलनाच्या आक्रमक पवित्र्या मुळे ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम हाती घेतले होते त्यांना हे काम 31 मे अगोदर पूर्ण करणे भाग पडले परंतु ते काम पूर्णत्वास न जाता ते काम काहीसे अधुरे स्वरूपात होते आणि ते काम थोड्या दिवसात पूर्ण करू अशा स्वरूपात कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून सांगण्यात आले होते मात्र आज मीतिला कॉन्ट्रॅक्टर यांनी काम पूर्ण झालेले आहे परंतु त्या ठिकाणी केलेला खर्च हा अंदाजे चार ते पाच लाखापेक्षा जास्त नाही असा एक दर्शनी अंदाज दिसतो आणि आलेला निधी हा भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून 30 लाख रुपये एवढा भव्य निधी नाशिक रोड येथील स्मारकासाठी आलेला होता मग ज्या स्ट्रक्चरच्या आधारे तीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला त्या स्ट्रक्चर प्रमाणे हे काम झाले किंवा नाही त्याचप्रमाणे आलेला तीस लाख रुपये निधी हा योग्य प्रमाणात खर्च झाला की त्यात भ्रष्टाचार झाला त्याचप्रमाणे मातोश्रींच्या या स्मारकाजवळ त्या ठिकाणी बसण्याची आसपास कुठलीही व्यवस्था नाही त्या ठिकाणी झाडांच्या अवतीभवती कुठल्याही प्रकारचे सुशोभीकरण झालेलं नाही गेटचं कुठलंही सुशोभीकरण झालेलं नाही आणि स्मारकाच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने व्हायला हवे ते त्या पद्धतीने कुठलेही सुशोभीकरण व सुव्यवस्था झालेली नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती व प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त कामगिरीतून या पूर्ण प्रकाराची पोलखोल करण्यात येईल आणि त्याचप्रमाणे या कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करण्यात येणार आहे व त्याचप्रमाणे कामाचे संपूर्ण दस्तऐवज बघून पुढील लढा चालू राहील मातोश्रींच्या स्मारकात व कार्यात भ्रष्टाचार सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका समाधान बागल यांनी घेतलेली आहे.



