नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

त्वरित मदतीसाठी डायल 112 चा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Nandgaon News

त्वरित मदतीसाठी डायल 112 चा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वेगवान मराठी : मारूती जगधने

दि ९ ऑक्टोबर २० २५

​नांदगाव: पोलीस स्टेशन हद्दीतील मांडवड गावात एका व्यक्तीने पोलिसांची दिशाभूल करत डायल 112 (तत्काळ आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली) या सेवेचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, . अनिल उत्तम थेट (वय 40) यांनी पोलीस शिपाई 1533 रवींद्र हरिश्चंद्र पवार यांना फोन करून तातडीने मदतीची मागणी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवड गावातील एका घटनेच्या ठिकाणी तातडीने मदत न मिळाल्यास आत्महत्या करण्याची धमकी एका व्यक्तीने दिली होती. या माहितीच्या आधारावर डायल 112 कडून तत्काळ मदत मिळणे अपेक्षित होते.
​मात्र, पोलीस पथक त्वरित घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेथे तसा कोणताही प्रकार किंवा व्यक्ती आढळून आला नाही. तपासानंतर पोलिसांना समजले की, मजकुर या व्यक्तीने 20 वर्षांपासून गावात दारू विक्री चालू आहे असा फान करून मदत न मिळाल्या स आत्महत्या करेल आ सा पोलिसांना त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या मदतीचा दुरुपयोग करण्याच्या उद्देशाने, जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली होती. त्याने डायल 112 च्या आपत्कालीन सेवेचा गैरवापर केला आणि पोलिसांची दिशाभूल केली.
​या गंभीर गैरप्रकाराबद्दल, नांदगाव पोलिसांनी संशयीत आरोपी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं) कलम 212 (क) (अ) आणि 226 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई रवींद्र हरिश्चंद्र पवार यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा । नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोहेका/539 नंदु चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!