नाशिकमध्ये ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ‘विनोरा’च्या पहिल्या शोरूमचे प्रसिद्ध उद्योगपती पियुष सोमानी यांच्या हस्ते उद्घाटन
Nandgaon News

नाशिकमध्ये ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ‘विनोरा’च्या पहिल्या शोरूमचे प्रसिद्ध उद्योगपती पियुष सोमानी यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक, दि. ८ ऑक्टोबर २०२५
‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहन देत ‘विनोरा’ (Veenora) या प्रीमियम लगेज आणि ट्रॅव्हल अॅक्सेसरीज ब्रँडच्या पहिल्या शोरूमचे उद्घाटन नाशिक येथे भव्य सोहळ्यात संपन्न झाले.
या शोरूमचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती तसेच CMD आणि CEO, ESDS Software Solutions चे श्री. पियुषजी सोमानी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माजी अध्यक्ष महाराष्ट्राचे मर ऑफ कॉमर्स चे माजी अध्यक्ष श्री. संतोषजी मंडलेचा, तसेच उद्योगवर्धिनीचे संस्थापक श्री. सुनीलजी चांडक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उद्घाटनानंतर नाशिककरांकडून ‘विनोरा’ या ‘मेक इन इंडिया’ ब्रँडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी शेकडो ग्राहकांनी शो रूमला भेट देऊन आवडत्या बॅग्सची खरेदी केली.
मान्यवरांचे विचार
श्री. पियुषजी सोमानी म्हणाले —
“विनोरा हा एक प्रेरणादायी उद्योग उपक्रम आहे. ‘मॅन्युफॅक्चरिंग’पासून ‘सेल्स’पर्यंत सर्व प्रक्रिया स्वतःच्या हातात घेऊन ब्रँड उभारणे ही उत्तम कल्पना आहे. मला खात्री आहे की विनोरा आणि त्यांची टीम संपूर्ण देशभर नाही तर विदेशात सुद्धा प्रसिद्ध होतील.”
असे सांगत त्यांनी संस्थापकांचे कौतुक करत ‘विनोरा’ ब्रँडला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
श्री. संतोषजी मंडलेचा म्हणाले —
“जगप्रसिद्ध उद्योगपती पियुष सोमानी यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन होणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. मोठ्या दूरदृष्टीने सुरू केलेला हा व्यवसाय नाशिकसह देश व विदेशात सुद्धा प्रसिद्ध होईल.”
श्री. सुनील चांडक म्हणाले —
“विनोराचे संचालक विवेक आणि योगिता जगधने यांनी नोकरीची वाट न पाहता उद्योगाची वाट निवडली, ही गोष्ट अत्यंत प्रेरणादायी आहे. ४० हून अधिक देशांमध्ये व्यवसाय असलेल्या श्री. सोमानी यांच्या हस्ते उद्घाटन होणे ही विनोरासाठी गौरवाची बाब आहे.”
श्री. किरण चव्हाण (विवेदा वेलनेस सेंटर आणि ग्रेप काउंटी) म्हणाले —
“विनोराची कहाणी मी कौतुकाने ऐकली आणि या ब्रँडचा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणारा प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या यशस्वी प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.”
विनोराची संकल्पना
“प्रवास असो वा दैनंदिन धावपळ — प्रत्येक क्षणाला सुंदरतेची साथ देणाऱ्या बॅग्स, तुमच्या स्टाईलचा आणि प्रवासाचा साथीदार – विनोरा!”
या संकल्पनेवर आधारित कंपनीकडून उच्च दर्जाच्या बॅग्स, ट्रॅव्हल बॅग्स आणि लगेज साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
उपस्थित मान्यवर
विनोराचे संस्थापक व सीईओ विवेक जगधने आणि योगिता जगधने,श्रुती सूर्यवंशी, भास्कर कदम (मा. नगराध्यक्ष), संजीव धामणे (ज्येष्ठ पत्रकार), केदार काबरा, अनूप चांडक, कुनाल चांदोरे, पंकज कुबेरकर, सचिन गीते, दिलीप दमारे, डॉ. हितेश चौधरी, आनंद कासलीवाल, अंकुश सोमानी, अरुण जुन्नरे, वेदांशू पाटील, हिरन चौधरी, अजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जगधने, कदम, पाटील, सूर्यवंशी, शहाणे, भामरे, खैरनार, आहिरे, चांडक आदी परिवारांसह विनोरा टीम, फ्रेंड सर्कल आणि नाशिकच्या उद्योगनगरीतील अनेक लघु-मोठे उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयोजकांचे आवाहन
“आपण सर्वांनी ‘मेक इन इंडिया’ला साथ देत, ‘विनोरा’सारख्या स्थानिक ब्रँडना प्रोत्साहन द्यावे,” असे आयोजकांनी सांगितले.
समारोप करताना योगिता जगधने यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे, उपस्थित मान्यवरांचे आणि अतिथींचे मनःपूर्वक आभार मानले.
टीम विनोरा
. सुमितकुमार जगधने
• मिस श्रुती सूर्यवंशी
• श्री. सुमित भोकरे
• श्री. दीपक आहिरे
शोरूमचा पत्ता
विनोरा शोरूम, दुकान क्र. १, वरद अपार्टमेंट, नंदन स्वीट्स समोर, कॉलेज रोड, यशवंत कॉलनी, नाशिक.



