महाराष्ट्र,देश

वणी गडावर इनोव्हा दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू; पटेल कुटुंबातील सर्वांचा करुण अंत ; मृतांची नावे आली समोर

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दिनांक ७ डिसेंबर २०२५ :- वणी गडावर भीषण अपघाताची घटना घडली असून इनोव्हा गाडी थेट सुमारे ६०० फूट दरीत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पिंपळगाव ब येथील MH-15-BN-0555 क्रमांकाची इनोव्हा गाडी पिंपळगाव चिंचखेड मार्गे मौजे सप्तश्रृंगीगड घाटातील मंकी पॉईंट परिसरातून जात असताना हा अपघात झाला.

गाडीमध्ये एकूण सहा जण होते आणि सर्व जण ठार झाल्याची माहिती कळवण महसूल विभागाकडून मिळाली आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मयत कुटुंबातील व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे —

कीर्ती पटेल (50)

रशिला पटेल (50)

विठ्ठल पटेल (65)

लता पटेल (60)

पचन पटेल (60)

मनीबेन पटेल (70)

या गंभीर दुर्घटनेची माहिती निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली असून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!