नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

या रस्त्यावरून दुचाकीला वळसा आणि चार चाकी ला सलामी द्यावे लागते !

Nandgaon News

या रस्त्यावरून दुचाकीला वळसा आणि चार चाकी ला सलामी द्यावे लागते !

वेगवान मराठी : मारुती जगधने

दि. 17 सप्टेंबर 2025, नांदगाव

आपण या मार्गावरून चार चाकी किंवा दुचाकी वाहनाने जर प्रवास करत असाल तर एका ठिकाणी आल्यावर  दुचाकीला वळसा मारावा लागतो आणि चार चाकी ला सलामी द्यावी लागते .

 . थोडक्यात आसे की

नांदगाव शहरातील मध्यवर्ती भागातील गोदावरी हॉस्पिटलसमोर मनमाड–मालेगाव–४० गाव–छ. संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या महिनाभरापासून मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. दोन ते अडीच फुटांपर्यंत खोल गेलेले हे खड्डे वाहनधारकांसाठी जणू मृत्यूचे आमंत्रण ठरत आहेत.

वाहनधारकांना या खड्ड्यांतून जाताना चारचाकी गाड्यांना जणू “सालामी” द्यावी लागते, असे नागरिक चिडून सांगतात. दररोज या ठिकाणी २ ते ५ किरकोळ अपघात घडत असून वाहनांचे नुकसान तर होतेच, पण प्रवाशांचे प्राण धोक्यात येत आहेत.

सर्वात धक्कादायक म्हणजे, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व रुग्णालयासमोरच अशी स्थिती असताना संबंधित प्रशासनाने अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. वारंवार तक्रारी करूनही केवळ आश्वासनांवर नागरिकांची बोळवण होत आहे, असा आरोप स्थानिकांनी केला.

नागरिकांचा सवाल आहे की, “आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयासमोरच रुग्णवाहिका अडखळली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? जीवाशी खेळ करून प्रशासन झोपलेले का?”

तात्काळ पॅचवर्क करून या महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे . यानंतर होणाऱ्या अपघातांना रस्ते विभाग जबाबदारीवरून त्यांच्यावर अपघाताची गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी प्रवाशांनी केले आहे .

मात्र शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये एवढी मोठाले रस्त्यावरती खड्डे पडलेले असतानाही याला जबाबदारी स्वीकारून कोणी तक्रार देखील करायला तयार नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तर मग त्यांची गाडी रोजच्या रस्त्यावरून फिरत राहते पण ते खड्डे टाळून जातात पण खड्डे बुजवत नाही होऊ द्या अपघात होतील तर होऊ द्या या भूमिकेत ते दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!