आर्थिक

सिन्नर ; इंडिया ब्ल्यूस कंपनी आता .. ” महाजनको आणि एनटीपीसी ” यांच्याकडे हस्तांतरित… आजपासून प्रकल्प धगधगणार … !

वेगवान नाशिक /  भाऊसाहेब हांडोरे 

सिन्नर. दि ; 1 फेब्रुवारी 2026 — सिन्नर औद्योगिक वसाहतीतील( जिल्हा नाशिक ) मुसळगाव येथील औष्णिक विद्युत प्रकल्प अखेर महाजनको आणि एनटीपीसी मुळे ( रविवार ) दिनांक 1 मार्च 2026 पासून पुन्हा एकदा कार्यरत होत आहे.
15 मार्च 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी हा प्रकल्प महाजनको कडे हस्तांदरीत केला आणि त्याला निधी दिला.
एनटीपीसी लिमिटेड ने शेअर्स बाजारांना कळले आहे की एनटीपीसी व महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड महाजनको यांच्या कंन्सोट्रियमने 24 फेब्रुवारी 2026 रोजी सिन्नर थर्मल पावर लिमिटेडचे अधिग्रहण पूर्ण केली.
कंपनीच्या 25 फेब्रुवारी 2000 26 च्या निवेदना नुसार हे अधिग्रहण NCLT मान्य ठराव योजनेअंतर्गत Lnsolvrncy and Bankruptcy code , 2016 मधील कार्पोरेट दिवाळी खोरी निवारण प्रक्रियेचा भाग म्हणून पूर्ण करण्यात आले.
सिन्नर थर्मल पावर लिमिटेड कडे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे 5×270 मेगावॉट ( एकूण 1, 350 ( मेगावॅट )
क्षमतेचा कोळसा – आधारित औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. या व्यवहाराची पुर्तता झाल्यानंतर एनटीपीसी समूहाची एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता 88.132 झाली असून व्यावसायिक क्षमता 87.052 पर्यंत वाढली आहे अशी कंपनीने जाहीर केली.

इंडियाबुल्स कडे असलेली हजारो एकर जमीन शासनाने ताब्यात घ्यावी…

             आ . सत्यजित तांबे

दरम्यान सिन्नर येथील एमआयडीसी मध्ये इंडियाबुल्सकडे वापराविना पडून असलेली हजारो एकर जमीन शासनाने ताब्यात घेऊन ती इतर उद्योगधंद्यांना द्यावी. यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी अधिवेशन आवाज बुलंद केला.
इंडियाबुल्स सुमारे पंधराशे जमीन एम.आय.डि.सी मार्फत ताब्यात घेऊन औष्णिक विकासासाठी वापरावी नव्या उद्योगामुळे शेतकरी कुटुंबातील युवक .बेरोजगार. तरुण व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. 2007 मधील भूसंपादनाच्या विविध शेतकऱ्यांना नोकऱ्या व विकास देण्याचे आश्वासना दिली. मात्र प्रकल्प बंद पडल्याने ती अपूर्णच आहे. प्रकल्प झाल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने पर्यायी धोरण व पुनर्वसन उपाय तातडीने जाहीर करावीत.
सिन्नर परिसर औद्योगिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी उपलब्ध जमीन पायाभूत सुविधा व धोरणात्मक निर्णयाची सांगड घालणे आवश्यक आहे.
नाशिक सिन्नर येथे रोजगार निर्मिती औद्योगिक वाढ आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी सभागृहात सत्यजित तांबे यांनी केली आहे.

 

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!