
हुतात्मा चौकातील अतिक्रमणांचा प्रश्न – प्रशासनाने ठोस पावले उचलावी!
नांदगाव शहरालगतच्या शासकीय शिवनेरी बंगल्या जवळील [ I love Nanda ] हुतात्मा चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठिकाण आहे. मात्र येथे गेल्या काही काळापासून वाढलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून, पादचारी व वाहनचालकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या प्रश्नाविरोधात माजी नगरसेविका अक्काबाई सोनवणे यांनी आंदोलन छेडून . अतिक्रमणांमुळे अपघातांचा धोका वाढतो. चौक परिसर व्यवसायिकांच्या अनधिकृत रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे व ठेले-हॉकर्सच्या बेकायदेशीर व्यवसायाने व्यापलेला दिसतो.
यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमनसारख्या आपत्कालीन वाहनांना वेळेत मार्ग मिळणे अवघड बनते. अशा स्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेकडे व सार्वजनिक सुविधांकडे शासन व स्थानिक स्वराज्य संस्था दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र स्पष्ट होते.
अतिक्रमणाचा प्रश्न हा केवळ नांदगावपुरता मर्यादित नाही, तर राज्यभरातील शहरी भागांमध्ये तीव्रतेने जाणवतो. प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाईचे आश्वासन दिले जाते, परंतु प्रत्यक्षात राजकीय हस्तक्षेपामुळे ती अंमलात येत नाही. आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित केलेली ही मागणी म्हणजे नागरिकांच्या सहनशीलतेचा टोक गाठल्याचे द्योतक आहे.
शासन व प्रशासनाने घ्यावयाची ठोस पावले :
. नियमित अतिक्रमणमुक्त मोहीम राबवून सर्व अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करावी.
. स्थायी पुनर्वसन धोरण आखून लहान व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.
. वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करून चौक व मुख्य मार्गांवर शिस्तबद्ध पार्किंग व वाहतूक नियंत्रण व्यवस्था करावी.
. राजकीय हस्तक्षेपाला आळा घालून कारवाई प्रक्रियेला पारदर्शकता द्यावी.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित या प्रश्नाकडे शासनाने केवळ आंदोलनाची वाट न पाहता स्वयंस्फूर्तीने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा, नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास कमी होण्याची भीती आहे .
यापूर्वी देखील ज्येष्ठ माजी नगरसेविका अक्काबाई सोनवणे यांनी अतिक्रमण संदर्भात आंदोलन केले होते या आंदोलनाच्या दरम्यान प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र त्यात आश्वासन देऊनही अद्याप अतिक्रमण काढले गेले नाही त्यामुळे ज्येष्ठ माजी नगरसेविका अक्काबाई सोनवणे यांनी पुन्हा उपोषण करून अतिक्रमण काढण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे .



