नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; 

Nandgaon news

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; 

​वेगवान मराठी : मारुती जगधने

दि . 23 मार्च 2026

नांदगाव तालुक्यातील मोरझर येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भावाने गेल्या सहा वर्षांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात संशयीतआरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही १७ वर्षांची असून ती मोरझर येथील रहिवासी आहे. आरोपी सुदाम रमेश चोळके (राहणार मोरझर, ता. नांदगाव) हा पीडितेचा नात्याने चुलत भाऊ लागतो. जुलै २०२० पासून ते २० मार्च २०२६ या कालावधीत, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन आरोपीने तिला व तिच्या आई-वडिलांना मारण्याची धमकी दिली. या धाकाखाली त्याने पीडितेच्या राहत्या घरी आणि स्वतःच्या घरी वेळोवेळी बळजबरीने शरीरसंबंध ठेवून लैंगिक अत्याचार केले.

२० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास पीडित मुलगी शेतात एकटी असताना संशयीत आरोपीने पुन्हा तिच्याजवळ जाऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि अश्लील मागणी केली. या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पीडितेच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलिसांनी आरोपी सुदाम रमेश चोळके याच्याविरुद्ध बी.एन.एस. कलम ६४(२)(एफ)(एम), ६५(१), ७८, ३५१(२)(३) सह पोक्सो कायदा कलम ४, ६, १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!