नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

नांदगाव येथे ध्वजारोहण

Mandgaon News

नांदगाव येथे ध्वजारोहण उत्सवात संपन्न

 

वेगवान मराठी :- ( दिः १५ ऑगस्ट ) :

मारूती जगधने

नांदगाव येथील नगरपालिकेच्या आवारात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व ध्वजारोहणाचे मानकरी म्हणून नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शामकांत जाधव यांनी राष्ट्रीय ध्वज फडकावला.

 

ध्वजारोहणानंतर त्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व देशभक्तीचा संदेश देत नगरपालिकेच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.

कार्यक्रमास नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी, स्थानिक मान्यवर, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी टाळ मृदंगासह भजने पथकाचे देखील आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते .

 

पालिकेसह परिसर तिरंगा रंगाने भरला होता पालिका परिसरामध्ये सर्वत्र रांगोळी काढण्यात आली होती .पांढऱ्या रेषा मारून नागरिकांसाठी ध्वजारोहणाला व्यवस्था करण्यात आली होती .

 

आणि यावेळी वैजनाथ जिजाजी हायस्कूल . सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय .उर्दू हायस्कूल आणि शहरातील इतर विद्यालयातील विद्यार्थी व स्थानिक नागरिक ,माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आदींनी ध्वजारोहणासाठी प्रत्यक्षात हजेरी लावून ध्वजारोहणामध्ये सामील झालेत यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गुणी विद्यार्थ्यांना, गुणी नागरिकांना ,गुणी कर्मचाऱ्यांना पारितोषिक वितरण मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी पालिका प्रशासन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, कविता व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण देशभक्तीमय केले. अखेरीस राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!