नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

नगरपरिषद व महिला बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Nandgaon news

 नगरपरिषद व महिला बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान”
वेगवान मराठी : मारुती जगधने
दि .15 मार्च 2026
, महिलांनी घराची जबाबदारी सांभाळत समाजात सर्वांगीण प्रगती साधावी आणि स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जावे.असे मत सौ अंजुमताई कांदे यांनी व्यक्त केले त्या महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या .
  नांदगांव तालुक्यातील मनमाड नगरपरिषद व महिला बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी समृद्धी सहकारी बँकेच्या चेअरमन तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. अंजुमताई कांदे यांना “कर्तृत्ववान महिला” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित महिलांमधून ११ भाग्यवान महिलांची निवड करून त्यांना पैठणी भेट देण्यात आली.
यावेळी बोलताना सौ. अंजुमताई  कांदे म्हणाल्या की, महिलांनी घराची जबाबदारी सांभाळत समाजात सर्वांगीण प्रगती साधावी आणि स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जावे.
दरम्यान, मनमाड येथे भव्य रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. आमदार सुहास  कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून मनमाड-नांदगाव शहरासह संपूर्ण मतदारसंघातील युवकांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या रोजगार मेळाव्यात सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी जवळपास १६० विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांकडून डायरेक्ट जॉइनिंग लेटर देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!