लोकल बातम्या

कोंढार सरपंच पदी पूजा पद्मने

Nandgaun News

कोंढार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूजा सोमनाथ पदमने यांची बिनविरोध निवड

वेगवान मराठी : मारुती जगधने

नांदगांव : दि . 22 ऑगस्ट 2025 :

.  कोंढार ता . नांदगांव ग्रामपंचायत सरपंचपदी पूजा सोमनाथ पदमने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेसाठी ग्रामविकास अधिकारी संतोष बैरागी, मंडळ अधिकारी परदेसी  तसेच पोलीस पाटील देविदास पवार यांच्या उपस्थितीत व  ही प्रक्रिया पार पडली.

यावेळी माजी सरपंच रेखाताई समाधान शेंडगे, उपसरपंच लक्ष्मण मोरे, ग्रामपंचायत सदस्य मिनाताई आयनोर, ललिता शेरमाळे, सीताराम शेरमाळे, तसेच कोंढार गावातील प्रतिष्ठित नागरिक समाधान शेंडगे (माजी चेअरमन), सुरेश खंडेकर, सोमाबाबा गोटे, दत्तू शेंडगे, किरण मोरे, खंडू खेमणार, संजय पदमने, साहेबराव बिडगर, सोमनाथ पदमने, बाळू शिंदे, संदीप खताळ, जयकुमार खंडेकर आदी मान्यवर  उपस्थित होते.

गावकऱ्यांनी पूजाबाईंच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या. महिला नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीचे कार्य अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!