- या तालुक्यात हरणाच्या पिल्लाचा थरारक बचाव
वेगवान मराठीः मारुती जगधने
दि . १६ जानेवारी २०२६
नांदगाव तालुक्यात हरणाच्या पिल्लाचा थरारक बचाव; ग्रामस्थांची तत्परता आणि वनविभागाचा समन्वय
नांदगाव तालुक्यातील ठेकू तांडा (खंगाळ्याच्या तलावाजवळ) येथे शेतात काम करत असताना उपसरपंच राजेंद्र चव्हाण आणि कैलास छगन राठोड यांच्या निदर्शनास एक धक्कादायक घटना आली. काही भटके कुत्रे हरणाच्या पिल्लावर हल्ला करत असल्याचे त्यांनी पाहिले. क्षणाचाही विलंब न करता दोघांनी धाव घेऊन कुत्र्यांना पिटाळून लावले आणि पिल्लाची सुटका केली.
यानंतर त्यांनी तातडीने वनविभागाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनरक्षक नवनाथ बिन्नर यांनी वरिष्ठ अधिकारी हेमंत कोकाटे व डी. एफ. वडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ बचाव पथक रवाना केले.
वनमजूर विष्णू जाधव, नितीन जाधव, अजय जाधव आणि वाल्मीक चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन हरणाच्या पिल्लाचा ताबा घेतला. पिल्लावर आवश्यक प्रथमोपचार करण्यात आले. पिल्लू सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सायंकाळी उशिरा त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात जंगलात सोडण्यात आले.
ही घटना मानवी संवेदनशीलता आणि सरकारी यंत्रणेमधील प्रभावी समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरली आहे. मोकाट कुत्र्यांमुळे वन्यजीवांना निर्माण होणारा धोका चिंतेचा विषय असला तरी, स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे या हरणाच्या पिल्लाचे प्राण वाचले
दरम्यान वनविभागाने नियमीत पोट्रोलिग करून वन्य प्राण्यां ची काळजी घ्यावी अनेक वेळा वन्य प्राण्यां वर हा ल्ले होतात पण त्याची दखल किंवा काळजी घेत नहीं ❓



