नाशिक ग्रामीण

नोकरीच्या ठिकाणी वास्तव्यास न राहिल्यास शासकीय सेवकांच्या गाडीच्या टायरची हवा काढू — !

वेगवान नाशिक /  भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर , दि : 16 जानेवारी 2026 — नोकरीच्या ठिकाणी वास्तव्य न  राहिल्यास शासकीय सेवकांच्या

गाड्यांच्या टायरची हवाच काढू . दिनांक 26 जानेवारी 2026 पासून प्रत्येक गावात जाऊन कामाच्या ठिकाणी वास्तव्य न राहणाऱ्या

सकीय सेवकांच्या गाड्यांच्या टायरची हवा काढू आंदोलन करण्यात येईल असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात श्री.बैरागी यांनी म्हटले आहे.

शासकीय आदेशाची पायमल्ली करणाऱ्या तालुक्यातील सर्व शिक्षक .ग्रामसेवक .ग्राम विकास अधिकारी. आरोग्य सेवक .व इतर अधिकाऱ्यांना ते काम करत असलेल्या त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी वास्तव्यास राहण्याची सक्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी गट विकास अधिकारी अशोक भवारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .तसे न झाल्यास संबंधित सेवकाच्या दुचाकी व चार चाकी गाडी च्या टायरची हवा काढण्यात येईल . असा इशारा निवेदनात  देण्यात आला आहे. शासनाचा घर भाडे भत्ता लाटण्यासाठी खोटा ठराव शासनाला पाठवून दर महिन्याला पैसे लाटण्याचा जो प्रकार तालुक्यात सुरू आहे त्यावर तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी यावर लक्ष घालून संबंधित सेवकाला मुख्यालयीच राहण्याचा सक्ती करावी . शासनाचे फसवणूक टाळावी. कारण तालुक्यातील शिक्षक .आरोग्य अधिकारी. ग्रामसेवक .ग्रामविकास अधिकारी. आरोग्य सेवक. हे आपल्या कामाच्या ठिकाणी न राहता तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी राहून नोकरी करतात व नोकरीच्या ठिकाणी न राहता खोटा प्रस्ताव पाठवून घर भाडे वसूल करतात. नोकरी एका ठिकाणी व राहायला दुसऱ्या ठिकाणी असल्यामुळे याचा फटका ते काम करत असलेल्या गावांना बसत असतो सदर अधिकारी व शिक्षक ज्या गावात  काम करतात त्याच ठिकाणी न रहता  खोटे भाडेकरार करून ते शासनाकडे सादर करतात शासनाकडून घरभाडे भत्ता वसूल करतात. सिन्नर तालुक्यातील बहुतेक ठिकाणी संबंधित सेवक आपल्या मुख्यालयी न राहता सिन्नर. नाशिक. सारख्या ठिकाणी राहून नोकरी करतात .कामाच्या ठिकाणी न राहिल्यामुळे दूरवरून प्रवास करून आलेला कर्मचारी आरामाचा मार्ग शोधतो . तशी गरज असल्याने  महत्त्वाच्या कामांना वेळ लागतो आणि कामे लांबणीवर पडतात याचा सर्वसामान्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो .
त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी आंदोलनाचा एक अनोखा मार्ग निवडला असून संबंधित सेवक मुख्यालयी न राहिल्यास दिनांक 26 जानेवारी 2026 पासून कामाची वेळ संपतात सेवकाची दुचाकी व चार चाकी गाडीच्या टायरची हवा काढू. असा स्पष्ट इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.

Oplus_131072

हे आंदोलन सुरूच ठेवून प्रत्येक गावात दररोज एक दिवस याप्रमाणे टायरच्या हवा काढण्याचा पवित्रा श्री.बैरागी यांनी बोलून दाखविला. यात विशेषता ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचा जास्त प्रमाणात बाहेरगावी राहण्याचा प्रकार समोर येताना दिसत आहे. परंतु शासनाचे वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून एक प्रकारे संबंधित सेवकाची पाठ राखण करतात की काय असा प्रश्नही बैरागी यांनी उपस्थित केला आहे .

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!