नाशिक ग्रामीणनाशिक शहर

व्हॉट्सॲप व फोनद्वारे १४.२५ लाखांची फसवणूक; मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे अधिकारी असल्याचे भासवून वृद्धास जाळ्यात ओढले

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद:- मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी व अधिकारी असल्याचे भासवून लासलगाव येथील ८२ वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याला व्हॉट्सॲप व फोनद्वारे संपर्क साधत पाच जणांनी तब्बल १४ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी रामराव रामचंद्र कौठे, वय ८२ वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त, सहकार खाते, महाराष्ट्र शासन, स्टेशन रोड, लासलगाव यांचे राहते घरी
दि.२० नोव्हें २०२५ ते १९ डिसें २०२५ रोजी पावेतो व्हॉट्सॲप व फोनवर आरोपी सिमरन मोबाईल क्र.८८२६१५९४७९, रवि कपुर व्हॉट्सॲप क्र.९३६८१३२४२०, ७८८०४९३३१७, गीता बॅनर्जी मोबाईल क्र. ९०६८७०११०९, विजयसिंग मोबाईल क्र. ७८८०४९३३१७, ७५६६५९७०१५, ७७०६८७६३३९, अनिलकुमार दास मोबाईल क्र. ७९०९५६६५३० वरील पाच आरोपींनी
फिर्यादी रामराव कौठे यांना क्सीस मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी व अधिकारी आहेत असे भासविणारे
व्हॉट्सॲप व फोनद्वारे कॉल करुन क्सीस मॅक्स लाईफ इन्शुरन्स पॉलीसीवर एजंटचे ३० टक्के कमिशन मिळवुन देतो तसेच कोरोना काळात कंपनीने १० दहा लाख रुपये जमा केले आहेत असे एकत्रीत २६ लाख ७१ हजार ७०६ रुपये तुम्हाला मिळतील असे सांगुन नमुद कंपनीचे नावाने पैसे जमा करण्यास सांगुन त्याची पावती पाठवली. फिर्यादी यांची एकुण १४ लाख २५ हजार रुपयांची फसवणुक केली म्हणुन सायबर पोलीस ठाणे गु.र.न ४/२०२५ भा.न्या.सं. ३१८ (४), ३१९ (२), ३ (५), माहिती तंत्र. कायदा कलम ६६ क,ड प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहीते करीत आहेत.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!