माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर . अटक टळली .. आमदारकी काम राहणार — ?

माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाकडून दिलासा… शिक्षेला स्थगिती — ! एक लाखाचा जामीन मंजूर ,,,
—– —– —– —- —- —-
अटक टळली , आमदारकी कायम राहणार — ?
सिन्नर , दि : 19 डिसेंबर 2025 —
माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे आणि 1 लाख रुपयांच्या जामीनावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामुळे त्यांची तात्काळ अटक टळली आहे .

कोकाटे यांना जामीन मंजूर होण्यासाठी व आरोग्य सुधारण्यासाठी सिन्नर मध्ये कोकाटे समर्थकांनी गोंदेश्वर मंदिरात जाऊन होम.हवन .पुजा पाठ. करून देवाला साकडे घातले… होते. यावेळी शहरातील विविध भागातील महिलांची गर्दी व जेष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते यांनी मंदिरात उपस्थिती लक्षणीय असल्याचे दिसून आले होते.. त्यांच्या या प्रार्थनेला यश आलेचे समाधान व्यक्त केले आहे…
कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते आणि 2 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते ⁴ ⁵.
हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली असली तरी, कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षेच्या प्रकरणात सदस्यत्व रद्द होऊ शकते ⁶. असे असले तरी कोकाटे यांच्या विरोधात बाजु माडणारे व याचिकाकर्ते सौ.राठोड यांनी कोकाटे यांची आमदारकी शाबूत राहणार असल्याची कबुली दिली आहे . परंतु हा लढा संपलेला नसून हाय कोर्टाने कुठेही असे म्हटले नाही की खालच्या कोर्टाचा निकाल चुकीचा आहे . त्यामुळे अपील करायचे का नाही ते आम्ही आता ठरवणार आहे असे त्यांनी प्रसारमाध्यमासमोर सांगितले .



