नाशिक ग्रामीण

नांदगाव व मनमाड नगरपालिका निवडणुकांत शांततेत मतदान; मनमाडमध्ये शिंदे गट–भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद

Nandgaon Neas

नांदगाव व मनमाड नगरपालिका निवडणुकांत शांततेत मतदान; मनमाडमध्ये शिंदे गट–भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद

वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव/मनमाड – नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकांमध्ये दोन्ही शहरांमध्ये रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. नांदगावमध्ये मतदान अत्यंत शांततेत पार पडले असताना मनमाड शहरात शिंदे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद झाल्याचा प्रकार घडला. या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला असला तरी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती सुरळीत झाली.

नांदगावमध्ये शांततेत मतदान
नांदगाव शहरात दिवसभर मतदानाची प्रक्रिया सुरळीत चालू राहिली. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील विविध मतदान केंद्रांवर चांगला उत्साह दिसून आला.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरासरी पंधराशे रुपये देऊन “मतदानावर प्रभाव टाकण्याचा” प्रयत्न झाल्याच्या चर्चा शहरात दिवसभर रंगल्या. यामुळे चुरशीची असणारी निवडणूक वातावरणात अधिक रंगत आली होती. मात्र प्रत्यक्षात मतदान शांततेत आणि कोणत्याही अडथळ्याविना पार पडले .

नांदगाव निवडणुकीत पत्रकारांसाठी माहिती न मिळाल्याने नाराजी ?
नांदगाव – नगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदानाची टक्केवारी वा इतर माहिती देण्यासाठी निवडणूक विभागाने पत्रकारांसाठी स्वतंत्र ग्रुप तयार केला होता. मात्र दिवसभर या ग्रुपवर एकही अधिकृत बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आले नाही. यामुळे क्षेत्रातील मतदानाची टक्केवारी, सकाळ-दुपार-संध्याकाळी झालेल्या मतदानाच्या हालचाली याबाबत पत्रकारांना कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र रात्री उशीराने मतदान % देण्यात आली .

अधिकृत माहिती न मिळाल्याने स्थानिक पत्रकारांमध्ये नाराजी उसळली. काही पत्रकारांनी निवडणूक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत, “अधिकाऱ्यांना जेंव्हा वाटेल तेंव्हा माहिती देतात; पत्रकारांची गरज किंवा वेळ याची कोणतीही दखल घेतली जात नाही,” अशी टीकाही केली.

दिवसभरातील मतदान सुरळीत पार पडले असले तरी माहिती व्यवस्थापनात झालेल्या दुर्लक्षामुळे निवडणूक विभागाच्या कामकाजाबद्दल असंतोष व्यक्त होत आहे.

नांदगाव शहर: सुमारे  60– 19% मतदान

मनमाड नगरपरिषद.
एकूण मतदार संख्या : 66594

पैकी झालेलं मतदान :

पुरुष : 21923
महिला : 20432
TG -03
एकूण :42358
टक्केवारी : 63.62%

मनमाडमध्ये किरकोळ वाद
मनमाडमध्ये मतदान सुरळीत सुरू असताना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही काळ तणाव तीव्र झाला असला तरी परिस्थिती नियंत्रणात आली आणि मतदान ठप्प न होता पुढे सुरूच राहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!