घाटमाथ्यावरील रस्त्यांचा आक्रोश
वेगवान मराठी : मारुती जगधने
” दि 28 ऑक्टोंबर 2025 “
- एकेकाळी पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असलेले घाटमाता पंचक्रोशी मध्ये रब्बीची सात गावे आहे येथे मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होत असते येथे कापसाची मोठी बाजारपेठ होते परंतु कालांतराने या ठिकाणी मका आणि इतर पिकातील होऊ लागले त्यामुळे पांढरे सोने कमी पडू लागले येथे एक काळ मोठ्या प्रमाणात कोट्यावधींची उलाढाल होत होत असेल परंतु या भागातील रस्ते आता मोठ्या प्रमाणात उघडून गेले त्यामुळे नागरिक रस्त्यांच्या संदर्भात अनेक समस्या विवेचन करतात या समस्यांना वाचा फोडण्यासाठी नागरिक घाटमाथा या ग्रुप वरती चर्चा करून आपले प्रश्न मांडत असतात .घाट माथ्यावरील बुलढाणा जोडणारे तसेच घाटमाथ्यावरील लहान मोठ्या गावांना जोडणारे शिवारस्त पांढरी रस्ते वाडी वस्ती गावे यांना जोडणारी रस्ते रस्तेच राहिले नाही?
बोलठाण (ता. नांदगाव) घाटमाथा परिसर —
या भागातील रस्त्यांची अवस्था आज इतकी बिकट झाली आहे की, खड्डे टाळावे की रस्ता शोधावा, हा प्रश्न प्रवाशांना पडतो आहे. पावसाळ्यानंतर तर परिस्थिती अधिकच वाईट बनली आहे. गावोगावी जाणारे रस्ते चिखलाने आणि खड्ड्यांनी व्यापलेले असून, वाहने चालवणे म्हणजे एकप्रकारे जोखमीचा खेळच झाला आहे.
स्थानिक शेतकरी, विद्यार्थी, आजारी रुग्ण आणि रोजंदारीसाठी प्रवास करणारे नागरिक या दुर्दशेचा दररोज सामना करत आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांना चिखलातून चालावे लागते, तर वाहनधारकांचे वाहन दुरुस्तीतच वेळ आणि पैसा जातो आहे.
याच भागात आश्चर्याची गोष्ट म्हणजे — नेत्यांची संख्या मोजता येणार नाही!
गावातील प्रत्येक गल्लीला, प्रत्येक चौकात एखादा बॅनर, फोटो किंवा शुभेच्छा फलक दिसतो — पण रस्त्यांच्या अवस्थेकडे मात्र कोणीच लक्ष देत नाही.
निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने आजही फक्त भाषणांपुरतीच राहिली आहेत.
नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे तक्रारी केल्या, तरी आजवर ठोस कारवाई झालेली नाही.
घाटमाथ्याच्या जााातेगांव , बोलठाण, ढेकू,
कुसुमतेल ,गोंडेगांव, रोहीले सह इतर गावांना जानाऱ्या रस्त्यांवरून परिसरात शेतमाल वाहतूक, शालेय बस, अॅम्ब्युलन्स यांना देखील अडचणी येतात — आणि याचा फटका थेट जनतेलाच बसतो आहे.
स्थानिक तरुणांनी आता एकच हाक दिली आहे —
“फलकांवर नव्हे, रस्त्यांवर काम पाहिजे!”
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आता तरी या भागाकडे लक्ष द्यावे, हीच जनतेची एकमुखी मागणी आहे.



