मुख्यमंत्र्यांच्या कालच्या घोषणा अभिनंदन! उसाचा काटा मारणाऱ्या कारखान्याचा प्रथम संजीवनी व कोळपेवाडी चौकशी करावी – डमाळे पाटील
मुख्यमंत्र्यांच्या कालच्या घोषणा अभिनंदन! उसाचा काटा मारणाऱ्या कारखान्याचा प्रथम संजीवनी व कोळपेवाडी चौकशी करावी - डमाळे पाटील

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला :दिनांक :7 ऑक्टोबर / महाराष्ट्राचे धडाडीचे मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडवणीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात काल उसाचा काटा मारणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्याची घोषणा अत्यंत चांगली केली असून त्यांचे शेतकरी व आम्ही अभिनंदन करतो असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष,माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा डमाळे पाटील यांनी केले आहे.
डमाळे पाटील यांनी तात्काळ एका पत्रकाद्वारे मुख्यमंत्र्यांना कळविले आहे की,आपण अहिल्यानगर जिल्ह्यात केलेली घोषणा ज्या ठिकाणी केली त्याची सुरुवात कोपरगावच्या कारखान्यापासून सुरुवात करावी कोपरगाव तालुक्यातील संजीवनी कोल्हे, कोळपेवाडी काळे, यांच्यापासून काट्यांच्या चाचण्यांची सुरुवात करावी तरच आपली घोषणा खरी ठरेल अन्यथा घोषणेवर शेतकऱ्यांमध्ये हसू होऊ नये अशी आम्ही आपणास विनंती करत आहे.
आपण ज्या उपऱ्या व बाहेरून सर्व पक्ष फिरून आलेल्या साखर कारखानदार सम्राटांची चोचले पुरवतात शेतकऱ्यांचा असणारा कारखाना स्वतःची प्रायव्हेट कंपनी असल्यासारखी वापरतात आणि शेतकऱ्यांची हेळसांड करतात अशी लोकांची भावना आहे.शेतकऱ्यांची चेष्टा होत आहे. वरिष्ठ नेते त्यांची लाल चांगुलपणा करतात अशी कुजबूज कालच्या सभेत चालू होती,म्हणून आपण एक स्वाभिमानी मुख्यमंत्री आहेत.आपण केलेली घोषणा बद्दल आम्हाला आनंद झाला.आमच्या मनात याबाबत कुठलीही शंका नाही. मात्र शेतकऱ्यांची उसाचा काटा मारण्याची पद्धत कधी संपणार याबाबत यापूर्वी अनेक तक्रारी झालेल्या आहेत,यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी,सहकार मंत्री यांनी याबाबत कोणतेही लक्ष दिलेले नाही.त्या त्या वेळेच्या सरकारनी कधी ढुंकूनही बघितले नाही.मात्र आपण कालची केलेली घोषणा लोकांना खूप आवडली आहे. दोन्हीही कारखान्यांना कोपरगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड व येवला तालुक्यातील ऊस दिला जातो व सभासद पण आहेत.
आपण कालच्या घोषणेमुळे ऊस उत्पादक शेतकरी सुखावला आहे मात्र ही गोष्ट ठरू नये अशी लोक भावना आहे. त्याचप्रमाणे ऊस कारखान्यातून उपपदार्थाचे निर्मिती होती त्या उपक्रमातून शेतकऱ्यांना त्याचा हिस्सा मिळत नाही, मात्र कारखानदार आपले घर भरून देतात म्हणून उपपदार्थ निर्मिती मधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपण न्याय द्यावा अशी विनंती आहे. कोळपेवाडी व संजीवनी म्हणजेच काळे व कोल्हे यांच्या कारखान्यापासून काटा मारण्याची चौकशी करावी अशी सर्वांची अपेक्षा आहे आपण कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहात आपणही शेतकऱ्यांच्या वतीने मी आपणास विनंती करत आहे आणि आपण निश्चितपणे हे कर्तव्य पार करणार यात आम्हाला शंका नाही असे शेवटी बाबा डमाळे पाटील म्हणाले.
बाबा डमाळे पाटील
भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
©कोपरगाव पत्ता-बाबा कॉम्प्लेक्स कोर्ट रोड कोपरगाव*
फोन-9850599966



