नाला बंडिंग फुटली, शेतकऱ्याची विहीर बुजली, तर सुपीक मातीही वाहून गेली…
नाला बंडिंग फुटली, शेतकऱ्याची विहीर बुजली, तर सुपीक मातीही वाहून गेली...

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला :दिनांक 23/09/2026
येवला तालुक्यातील पूर्व भागात सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे झालेल्या अचानक मुसळधार पावसाने वाघाळे (ता. येवला) येथील शेतकरी भाऊसाहेब जगन्नाथ सोमासे यांच्या शेताजवळील नाला बंडिंग फुटल्याने पाणी, चिखल, माती व दगड गोटे थेट विहिरीत कोसळून विहीर पूर्णपणे बुजली आहे.
यात विहिरीचे सुमारे 2 लाख रुपयांचे चे नुकसान झाले आहे. त्यांनी आपली विहीर पूर्ववत करून देऊन त्याचा पूर्ण खर्च शासनाने उचलावा अशी मागणी केली आहे.
विद्युत पंप ( मोटार), स्टार्टर पण विहिरीत बुजून गेला आहे….
अरुण पंढरीनाथ सोमासे यांच्या घरासमोरील नाला बंडिंग फुटल्याने त्यांच्या पिकासाह शेताची माती ही वाहून गेली असून शेताचे प्रचंड नुकसान झाले आहे.
आता माती कुठून आणावी असा प्रश्न शेतकरी भाऊसाहेब सोमासे आणि अरुण सोमासे यांना पडला आहे….
दोन्हीही शेतकऱ्यांनी आपल्या विहिरी व बंडिंग दुरुस्तीबाबत माननीय तहसीलदार, कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
अतिवृष्टी ने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
********************
निसर्गाच्या या संकटाने शेतकरी आता पूर्णतः आर्थिक संकटात सापडणार आहेत. याशिवाय, पिक विमा योजनांतील बदल आणि कर्जाची दडपणाची परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिक कठीण होणार आहे.
जास्तीत जास्त मदत, नुकसान भरपाई मिळावी
**************
प्रत्यक्ष भागवत राव सोनवणे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे,
“शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानी चे फोटो व्हिडीओ जिओ टॅग करुन काढावे- तलाठी, कृषी अधिकारी यांच्या संपर्कात राहून पाहणी करुन घ्यावी.”
भागवतराव सोनवणे
संयोजक, जलहक्क संघर्ष समिती
**********



