आधीच बसचा तुटवडा..आणि त्यात ३२ कोकणात पाठविल्या, प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल

आधीच बसचा तुटवडा ..आणि त्यात ३२कोकणात पाठविल्या, प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल
वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
विरगांव दि. २६ऑगस्ट २०२५:- कोकण विभागात गणेशोत्सव व्यापक स्वरूपात साजरा केला जात असल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर परिवहन महामंडळाच्या बस सोडल्या जात आहेत .त्याप्राश्वभुमिवर सटाणा बसस्थानकातून सुमारे ३२ बसेस पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे बागलाण तालुक्यातील १७१ गावातील दळणवळण फक्त १८ बसेसच्या भरवशावर सुरु आहे.
बागलाण तालुक्यात एकूण गावांची संख्या १७१ असून या गावातील प्रवाशांसाठी सटाणा बस स्थानकात सध्याच्या घडीला उपलब्ध असलेल्या फक्त १८ बस आपले दळणवळणाचे कार्य पार पाडताना दिसत असुन प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
उद्या पासून कोकणात गौरी गणपतीच्या उत्सवाला सुरुवात होणार असल्याने सटाणा बस स्थानकातून ३२ बस पाठविण्यात आलेल्या आहेत. या स्थानकात एकूण ६७ बस असून त्यातीमधील काही बस ह्या कायम नादुरुस्त अवस्थेत असतात. सुस्थितीत असणाऱ्या १४ बसपैकी
पुणे, नाशिक व नंदुरबार या शहरासाठी फेऱ्या मारत असल्यामुळे उर्वरित १८ बस फक्त या १७१ गावासाठी उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांना विद्यार्थी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उत्पनाच्या दृष्टीने सटाणा आगार नेहमीच अग्रेतसर राहत असुन हि या आगारात बसची संख्या अतिशय कमी आहे.
गौरी गणपतीसाठी पाठवण्यात आलेल्या बसमुळे ग्रामीण भागातील आणि काही लांब पल्ल्याच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून अवाच्या सव्या भाडे आकारणी केली जात असल्यामुळे
प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे. दरम्यान बसगाडयांच्या तुटवड्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची दिवसभर तुडूंब गर्दी बघायला मिळते आहे.
प्रतिक्रिया:-
नाशिक, मालेगांव, धुळे याठिकाणी प्रवाशांना बसगाडीच्या प्रतीक्षेत टाटकळत उभे रहावे लागत आहे. नोकरी, व्यवसाया, व्यापार, शासकिय निमशासकीय कामनिमित्त जावे लागते .मात्र बस फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच ग्रामीण भागातील प्रवासी व विद्यार्थीचे हाल होत आहे.
श्रद्धा रौंदळ, विद्यार्थी,सटाणा



