नाशिक ग्रामीण

मल्हार हिल कॅम्पस मध्ये ध्वजारोहण

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ

विरगांव ता. १५ऑगस्ट २०२५. : भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमधील प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शुक्रवार ( ता. १५) स्वातंत्र्य दिनानिमित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र कोठावदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी बागलाण तालुका सैनिक संघटनेचे उत्तम भामरे,रवींद्र जगताप,कारभारी कापडणीस,सुरेश पवार, नंदकिशोर रौंदळ, बाळासाहेब सावकार,शरद निकम,
शाळाविकास अधिकारी निर्मला ,किरण सोनवणे,नंदकिशोर शेवाळे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .मुख्याध्यापक पंकज दातरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून वर्षभरातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. विभाग प्रमुख सारिका शिंदे, कल्याणी गायकवाड, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.शेखर अहिरे यांनी सूत्रसंचालन तर ज्ञानेश्वर सोळंके यांनी आभार मानले.

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!