या भागात बिबट्याची हिंमत वाढली.. दिवसा ढवळ्या तरुणावर हल्ला
या भागात बिबट्याची हिंमत वाढली.. दिवसा ढवळ्या तरुणावर हल्ला

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि. 15 ऑगस्ट 2025 — आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी सात च्या दरम्यान कारवाडी ( शहा , या, सिन्नर ) प्रतिष्ठित शेतकरी व शहा सोसायटी चे माजी चेअरमन श्री,रेवबा तुकाराम जाधव यांच्या मुलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला परंतु प्रसंगावधान राखत विकास रेवबा जाधव यांनी त्यांच्या तावडीतून सुटका केली… श्री.विकास जाधव या तरुणास सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने ताबडतोब उपचारासाठी नाशिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अरुण जाधव यांनी सांगितले.. सिन्नर वनक्षेत्राधिकारी व कर्मचारी यांनी दाखवलेली तत्परता आणि वेळेवर उपचार झाल्यानं श्री,जाधव यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. ..
रात्री पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाची पहाणी करण्यासाठी हा तरुण घराशेजारी शेतात गेला होता.. पाणी साचल्याने ते फोडून देण्यासाठी खाली वाकला असता दबा धरुन बसलेला बिबट्याने प्राणघातक हल्ला केला परंतु प्रसंगावधान राखून ह्या तरुणाने धाडस करून बिबट्याच्या तावडीतून सुटका केली.. या पुर्वी रात्री च्या दरम्यान बिबट्या शिकारी साठी बाहेर पडत असे परंतु हल्ली या बिबट्याचा बिनधास्त वावर वाढला असून शाळकरी मुले आणि वृद्ध यांच्या जिवाला धोका वाढला आहे त्यामुळे…
तालुक्यातील बिबट्या चा बिनधास्त वावर वाढल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे… सदर घटना ही सकाळी सकाळी घडली आहे त्यामुळे बिबट्या बिनधास्त पणे फिरत असतात. दोन बछड्यांना सोबत घेऊन भक्षाच्या शोधत असलेला या मादीचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे…
या पुर्वी मागील काही दिवसांपासून तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ वाढला असून अनेक निष्पाप जीव गमावले आहे. त्यामुळे या व अशा वारंवार घटनेची गांभीर्याने दखल घेतली जाण गरजेचे आहे… तालुक्यातील आमदार व मंत्री माणिकराव कोकाटे व खासदार राजाभाऊ वाजे यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर मतदार संघातील प्रत्येक नागरिकाला सामाजिक संरक्षण देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी या नात्यानं या नेत्यांनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे….
15/08, 2:04 PM] BHAUSHAB R, HANDORE.. WEG: बिबट्याची हिंम्मत वाढली — सकाळी सात वाजता तरुणांवर हल्ला…



