महाराष्ट्र,देश

मंत्री म्हणून नाही तर एक भाऊ म्हणून ” धनश्री ” हिच्या पाठीमागे ऊभा राहणार … कोकाटे — ! तर खा, वाजे यांनी सुद्धा दिला मोठा दिलासा.,. !

सिन्नर ची कु.धनश्री हिच जगभर डंका....

वेगवान नाशिक  / भाऊसाहेब हांडोरे

क्रीडा मंत्री नाही तर एक भाऊ म्हणून धनश्री सांगळे हिच्या पाठीमागे उभा राहणार… कोकाटे — !  तर खा, वाजे यांनी सुद्धा दिला मोठा दिलासा… !

 

सिन्नर दि 10 ऑगस्ट 2025 — सिन्नर च्या कु, धनश्री सांगळे हिच्या धाडसी पराक्रमाचा जगभर डंका…

 

सिन्नर विधानसभा मतदारसंघातील, महाराष्टातील धाडसी कन्या आणि संपूर्ण भारताचा  अभिमान ठरलेली कुमारी धनश्री सांगळे वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम मध्ये सिंगल स्कूल रोविंग प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करत फायनल इ , श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे तर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले असून या क्रमवारीत 21 वा क्रमांक पटकवत तीनं सिन्नर सह महाराष्ट्र राज्य व भारतीय शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे त्यामुळे तीचं सर्व स्तरातून स्वागत होत असताना लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ नेते तिच्या मदतीला धावून आले आहे…

सिन्नर मतदारसंघातील आमदार व राज्यातील नवनिर्वाचित क्रीडा व युवा कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी कु, धनश्री हिच्या कडुन राखी बांधून घेतली… यावेळी श्री, कोकाटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले की.आजचा दिवस माझ्यासाठी कायमचा कोरला जाईल.आज रक्षाबंधनाच्या दिवशी कु, धनश्री हिने मला राखी बांधली त्या क्षणी मी मंत्री नव्हतो मी ती भाऊ होतो.तीच्या डोळ्यातील अभिमान आणि विश्वास पाहून मी भारावून गेलो आहे…

 ” धनश्री…. तुझ्या स्वप्नांच्या वाटचालीसाठी तुझा हा भाऊ कायम सोबत असेल. तुझ्या मेहनीतीला आणि प्रगतीला कुठेही अडथळा येऊ देणार नाही.. असा शब्द व विश्वास श्री.कोकाटे यांनी या निमित्ताने दिला.

,,,, धनश्री सारख्या प्रत्येक तरुणाईच्या स्वप्नांना बळ देणं हेच माझे परम कर्तव्य आहे.यासाठी राज्यांचा क्रीडा व युवा कल्याण मंत्री मी सदैव कटिबध्द आहे… अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे..

या प्रसंगी मंत्री माणिकराव कोकाटे हे भारावून गेले असल्याचे दिसून आले..

तसेच नाशिक जिल्ह्यातील खासदार राजाभाऊ वाजे यांनी सुद्धा एक भाऊ म्हणून मला राखी बांधली.. या मला सार्थ अभिमान आहे त्यामुळे भाऊ बनुन सदैव पाठीशी आहे.. एक खासदार या पुढे धनश्री हिच्या धाडसी पराक्रमाचा जगभर डंका वाजवला आणि भारतीयांची मान उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या या तरुणीने महाराष्ट्र सह सिन्नर तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाला अभिमान व आदर्श निर्माण केला आहे हे लक्षात घेतले पाहिजे… खासदार या पुढे तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत कायम सोबत असेल.. पराक्रमाचा वारसा जपणारा हा क्षण मनाला उभारी देत आहे त्यामुळे सिन्नर चं नांव सुवर्ण अक्षरात लिहिलेले गेले तो क्षण इतिहास म्हणून कायम जिवंत राहील असे मत श्री, वाजे यांनी व्यक्त केले आहे..

   धाडसी पराक्रमाचा वारसा जपणारा हा महाराष्ट्र सिन्नर च्या कु धनश्री सांगळे मानाचं स्थान मिळवून दिले आहे त्यामुळे सिन्नर चे भुमी पुत्र नाशिक जिल्ह्यांचे खासदार राजाभाऊ वाजे व सिन्नर तालुक्यांचे आमदार व क्रीडा व युवा कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी कु धनश्री हिच्या कडुन राखी बांधून घेतली. तिचा गौरव करण्यात आला….

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!