कांदा शेतकऱ्यांना रडवणार..?

वेगवान नाशिक/ मनोज वैद्य
दहिवड २७ जुलै
विठेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी विशाल भालचंद्र निकम यांच्या शेतातील चाळीत साठवणूक केलेला कांदा तिन महिन्यातच मोठ्या प्रमाणात सडला असुन, उख्ड्या वर फेकण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज झाला असून चाळीत साठवून ठेवलेला कांदा यंदा शेतकऱ्यांना रडवणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या वर्षी अतिशय कष्टाने पिकवलेला कांदा कवडीमोल भावाने विकायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, या हंगामात लागवड जरी जास्त प्रमाणात झाली होती तरी बदलत्या हवामानाचा फटका बसला.
याबाबत शेतकरी नेते कुबेर जाधव यांनी सांगितले की, यंदा कांद्याची लागवड मोठया प्रमाणात झाली असली तरी करपा व इतर रोगामुळे उत्पादन घटले, त्यातच सरकारच्या धरसोड वृत्ती मुळे कधी कांद्याचे भाव वाढल्याने शेतकरी कधी हसला तर सद्या बहुसंख्य शेतकऱ्यांचा कांदा चाळीत सडत असल्याने तो शेतकऱ्यांना रडवतो आहे.




