नाशिक ग्रामीण

व्यक्तिमत्त्व विकास

Nandgaon News

वेगवान माराठी ; मारुती जगधने
मनमाड, दि. ७ : येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेअंतर्गत ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि सकारात्मक दृष्टिकोन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या व्याख्यानासाठी प्रा. दिलीप शिंदे प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व, सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, ध्येय निश्चिती, नेतृत्वगुण, वेळेचे व्यवस्थापन तसेच अपयशाला सामोरे जाण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष उदाहरणे व विविध कृतींच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगितला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गवाणे होते. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. देवडे, डॉ. प्रा. कदम यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्याख्यानानंतर प्राचार्य डॉ. गवाणे यांच्या हस्ते प्रा. दिलीप शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि योग्य ध्येयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असा संदेश या व्याख्यानातून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!