नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

सरदार पटेल रोडवर खडीचे थारोळे; गणेश विसर्जन मार्ग धोकादायक!

Nandgaon News

सरदार पटेल रोडवर खडीचे थारोळे; गणेश विसर्जन मार्ग धोकादायक!

खड्डे बुजविण्याच्या नावाखाली केवळ खडी-कच टाकल्याचा आरोप; अपघाताचा धोका वाढला, राष्ट्रवादी काँग्रेसचा पालिका प्रशासनाला इशारा
वेगवान म रा ठी ; मारुती जगधने २२ सप्टेम्बर २०२६

मनमाड (नांदगांव ): शहरातील सरदार पटेल रोडवरील रेल्वे स्टेशन ते सराफ बाजार कॉर्नर या मुख्य वर्दळीच्या मार्गाची दुरवस्था झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. आगामी गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रमुख मार्ग असतानाही रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या नावाखाली डांबरीकरण करण्याऐवजी केवळ मोकळी खडी व कच टाकण्यात आल्याने रस्त्यावर खडीचे थर साचले आहेत. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.

रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता? वाढली असून, नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेषतः गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविक, लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी या मार्गावर होणार असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“हे खड्डे बुजविण्याचे काम आहे की अपघातांना दिलेले आमंत्रण?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे गुरुकुमार निकाळे यांनी उपस्थित केला आहे. पालिका प्रशासनाच्या कामाच्या गुणवत्तेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, नागरिकांच्या करातून मिळणाऱ्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये दर्जा राखला जात नसल्याचा आरोप केला आहे.

२४ तासांत खडी हटविण्याची मागणी

मनमाड (नांदगांव)सरदार पटेल रोडवरील विखुरलेली खडी व कच तातडीने हटवून रस्त्यावर दर्जेदार रोलिंग करून आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण करावे, अशी मागणी निकाळे यांनी केली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी रस्ता सुरक्षित व वाहतुकीस योग्य करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

रस्त्यावरील खडीमुळे अपघात झाल्यास किंवा विसर्जन मिरवणुकीत अडथळा निर्माण झाल्यास नागरिकांच्या संतापाला पालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

— गुरुकुमार निकाळे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!