नाशिक ग्रामीण
सिन्नर: कार कालव्यात कोसळली,महिलेचा मृत्यू , चौघे जखमी

सिन्नर/वेगवान नेटवर्क
तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने रात्रीच्या वेळी व्हॅगनार कार थेट कालव्यात कोसळली.सोमठाणे जवळून जाणाऱ्या गोदावरी नदीच्या उजव्या कालव्यात जाऊन कोसळली.
कारमध्ये चार प्रवासी होते,त्यातील एका महिलेच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
इगतपुरी तालुक्यातील हे प्रवासी सोमठाणे गावाकडे येत असताना सोमठाणे जवळील पाटाच्या तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट कालव्यात (पाटात) जाऊन कोसळली. या अपघातात गाडीतील चार प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील सुमन सुखदेव कोरडे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले.



