श्रेयस भामरेची राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत ‘सुवर्ण’ झेप!

श्रेयस हा मूळचा पिंपळकोठे (ता. बागलाण) येथील असून सध्या त्याचे कुटुंबीय सटाणा येथे स्थायिक आहेत. नाशिकच्या के.टी.एच.एम. कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या श्रेयसने कॉलेजच्या बोट क्लबवर आपला सराव पूर्ण केला. विशेष म्हणजे, कोणत्याही अधिकृत प्रशिक्षकाचे (कोच) मार्गदर्शन उपलब्ध नसताना केवळ स्वतःच्या जिद्दीवर आणि मेहनतीवर त्याने राष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवले आहे.
“क्रीडा क्षेत्रातील अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या श्रेयसची दैदिप्यमान कारकीर्द : श्रेयस हा अष्टपैलू खेळाडू असून त्याने यापूर्वी स्केटिंगमध्ये ३ राज्यस्तरीय व १ राष्ट्रीय, पोहण्यात १ राज्यस्तरीय, तर वॉटरपोलोमध्ये १ राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. रोइंगमधील ही त्याची तिसरी राष्ट्रीय स्पर्धा होती.
यशात कुटुंबाचा आणि मावशीचा मोलाचा वाटा ; श्रेयसच्या या यशामागे त्याचे वडील दीपक बाजीराव भामरे, आई कल्पना भामरे यांचा खंबीर पाठिंबा आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना श्रेयसने विशेषतः आपली मावशी विजया शिंदे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाचा आणि सहकार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. “स्वतःवर असलेला विश्वास आणि घरच्यांकडून मिळालेले प्रोत्साहन यामुळेच मी हे सुवर्णपदक जिंकू शकलो,” अशी भावना त्याने व्यक्त केली.



