देवळा शहरात भाजपचा जल्लोष; पश्चिम बंगालसह विविध राज्यांतील विजयाचा उत्सव

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद देवळा शहरात उमटले आहेत. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी देवळा शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी ‘पाच कंदिल’ चौकात एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.
राज्यातील निवडणूक निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपली ताकद दाखवून दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पाच कंदिल परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि विजयाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या उत्सवात स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने शहरात सर्वत्र आनंदाचे आणि उत्सवी वातावरण पाहायला मिळाले.
प्रमुख उपस्थिती:
या विजयोत्सवाप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते शंकर निकम, तालुकाध्यक्ष किशोर आहेर, शहराध्यक्ष अशोक आहेर यांच्यासह बंडू शेवाळकर, सुनील आबा आहेर, पिंटू आहेर, भाऊसाहेब आहेर, मनोज आहेर, अंबादास पवार, शरद सागर, चंद्रकांत आहेर, हेमंत बागुल, योगेश देवरे, लंकेश बागुल, रिंकू जाधव, समाधान महाजन, अनिल पगार, हरिश निकम, सौरभ वाघ, समाधान सोनजे, मयुर गुंजाळ, राहुल आहेर, दत्तात्रेय आहेर, तुषार शिरसाठ, गोरख शेवाळे, यश निकम आणि मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाने मिळवलेल्या या विजयामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांचे मनोबल वाढणार असून, हा विजय विकासकामांची पावती असल्याचे मत यावेळी तालुका अध्यक्ष किशोर आहेर यांनी व्यक्त केले.



