नाशिक शहरमहाराष्ट्र,देश

येवला–मनमाड–मालेगाव मार्गावरील अवजड वाहन वाहतुकीवर वेळेची मर्यादा

Nandgaon news

येवला–मनमाड–मालेगाव मार्गावरील अवजड वाहन वाहतुकीवर वेळेची मर्यादा

वेगवान मराठी : मारुती जगधने

दि . १७ मार्च 2026 नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत येवला–मनमाड–मालेगाव या महत्त्वाच्या मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, दिनांक २४ मार्च २०२६ पासून अवजड वाहनांची वाहतूक केवळ रात्री १० ते सकाळी ७ या वेळेतच सुरू ठेवण्यात येणार आहे. दिवसाच्या वेळेत या मार्गावरून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
हा रस्ता अहमदनगर व खान्देश भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. विशेषतः येवला आणि मनमाड शहरांमधील मुख्य रस्त्यांवर दिवसा अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. नव्या निर्णयामुळे ही कोंडी कमी होऊन शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
तसेच, शालेय विद्यार्थी, पादचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या संदर्भात ११ मार्च २०२६ रोजी मंत्रालयात जिल्हा प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या.
प्रशासनाने नागरिक आणि वाहतूकदारांना या निर्णयाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन पुढील काळातही अशाच उपाययोजना करत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.राज्याचे मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी या संदर्भातले एकत्र जारी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!