महाराष्ट्र,देश

नाशिक चे खासदार राजाभाऊ वाजे यांची ” भारत – भुतान ” संसदीय मैत्री गटाच्या सदस्य म्हणून निवड… !

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

  • नाशिक चे खा. राजाभाऊ वाजे यांची भारत – भुतान संसदीय मैत्री गटाच्या सदस्य म्हणून निवड… !
    सिन्नर. दि ; 6 मार्च – 2026 —
    भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी नाशिक लोकसभेचे खासदार मा. राजाभाऊ वाजे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
    भारत-भूतान संसदीय मैत्री गटाच्या (India–Bhutan Parliamentary Friendship Group) सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आहे, ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे.
    ही निवड केवळ वैयक्तिक सन्मान नसून नाशिक लोकसभेतील प्रत्येक मतदाराचा सन्मान आहे. भारत-भूतान मैत्री अधिक दृढ करण्यासाठी आणि दोन्ही देशांतील सहकार्य वाढविण्यासाठी त्यांचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.
    नाशिकच्या विकासासाठी आणि देशहितासाठी सातत्याने कार्य करणार असल्याची माहिती राजाभाऊ वाजे यांनी या निमित्ताने दिली.
    खासदार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नर विधानसभा निवडणुकीत मा . मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात कडवी झुंज देत हजारो मताधिक्य मिळवून आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी तालुक्यात अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले..
    मागील लोकसभा निवडणुकीत नाशिक मधुन उद्धव ठाकरे यांनी श्री.वाजे यांना सर्व प्रथम उमेदवार जाहीर करुन नाशिक चे खासदार म्हणून विराजमान केले.. खासदार राजाभाऊ वाजे यांनी कायम केंद्रीय पातळीवर नाशिक च्या महत्वाचे प्रश्नांबाबत आवाज उठवला आणि अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे खा.वाजे हे कायम चर्चेत राहिले. या सर्व गोष्टींचा निश्चितच फायदा झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या निवडीमुळे नाशिक जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यातुन त्यांचं कौतुक व अभिनंदन होत आहे.भ

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!