अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ : निधी मंजूर होवुनही विलंब का.. ? सवाल उपस्थित…..

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि , 28 फेब्रुवारी 2026 —
सिन्नर तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधी मिळण्यात विलंब; प्रशासनाकडून टाळाटाळ .. ?
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात सन 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाकडून बाधित शेतकऱ्यांसाठी मदत निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती असूनही, अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप प्रत्यक्ष निधी मिळालेला नाही, अशी गंभीर बाब समोर आली आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ : निधी मंजूर होवुनही विलंब का.. ? सवाल उपस्थित…..
शासनाने मंजूर केलेला निधी शेतकऱ्यांना तत्काळ द्यावा. वारंवार तक्रार करूनही कार्यवाही होत नसेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. गरीब शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणे ही काळाची गरज आहे.”
— अरुण रामचंद्र पांगारकर
संबंधित शेतकऱ्यांची यादी उपलब्ध असून त्यामध्ये नाव समाविष्ट असतानाही निधी मिळण्यात विलंब होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सिन्नर तहसीलदार कार्यालयात वारंवार विचारणा केली असता, “आज-उद्या” असे सांगून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या संदर्भात संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आली असून, जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त यांनाही ई-मेलद्वारे कळविण्यात आले आहे.

दरम्यान, “श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज” या सामाजिक उपक्रमाच्या वतीने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन पात्र शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
लवकर कार्यवाही न झाल्यास पुढील कायदेशीर तसेच लोकआंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



