नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

हिसवळ बु. येथील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे रस्ता मोकळा करून देण्याची मागणी

Nandgaon news

हिसवळ बु. येथील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे रस्ता मोकळा करून देण्याची मागणी
वेगंवान मराठी दी 15 जुलै 2026
नांदगाव : तालुक्यातील हिसवळ बु. येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन गावातून शास्त्रीनगरकडे जाणारा जुना वहिवाटीचा रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, हिसवळ बु. गावातील चौफुलीपासून पुढे उतरकेंडे पांदण मार्गे नदीकडे जाणारा पाणंद व जुना वहिवाटीचा रस्ता काही व्यक्तींनी अडविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या रस्त्याचा वापर शेतकरी आपल्या शेतीपर्यंत जाण्यासाठी, शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी तसेच दैनंदिन ये-जा करण्यासाठी करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या मार्गामुळे अनेक कुटुंबांचा शेती व्यवसाय सुरू असून मुलांचे शाळेत जाणे-येणेही या रस्त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे संबंधितांनी केलेला अडथळा दूर करून सदर रस्ता पुन्हा वहिवाटीसाठी खुला करावा, अशी मागणी तहसील प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

सदर निवेदनावर हिसवळ बु. ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून तहसील कार्यालयात ते दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!